HW News Marathi
महाराष्ट्र

एकीकडे होळीवर बंदी, दुसरीकडे शब-ए-बारात ला परवानगी’, ठाकरे सरकारचा भाजपकडून जाहीर निषेध

मुंबई | शब-ए-बारात ला नियमांसह परवानगी पण होळीच्या सणावर कडक निर्बंध, ठाकरे सरकारच्या या हिंदू विरोधी फतव्याला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विरोध असून मुंबईतील हिंदू बांधवांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत आपापल्या श्रद्धेनुसार होळी साजरी करावी, असे आवाहन मुंबई भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.

मागील वर्षभरापासून कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर निर्बंध लादणाऱ्या ठाकरे सरकारने इतर धर्मियांच्या उत्सवांना मात्र खुली सूट दिली आहे. ठाकरे सरकारच्या अशा हिंदू विरोधी कृत्यांचा जाहीर निषेध करून आम्ही होळी साजरी करणारचं, ठाकरे सरकार मध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी आमच्यावर कारवाई करून दाखवावी, असे आव्हान सुद्धा अतुल भातखळकर यांनी दिले आहे.

 

काय आहेत नियम?

होळी, धुळवडीला सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. पालिकेने दोनच दिवसांपूर्वी तसे आदेश जाहीर केले आहेत. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पाच पथके तयार क ली आहेत. ही पथके फिरतीवर राहतील व तपासणी करतील. एखाद्या ठिकाणी नियमभंग होतो आहे असे आढळले तर समज दिली जाईल. मात्र त्यानंतरही लोकांनी ऐकले नाही तर पोलिसांची मदत घेतली जाईल व कारवाई केली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्य विभागाच्या घोटाळ्याच्या प्रश्नावर राजेश टोपेंनी फडणवीसांना दिले उत्तर !

News Desk

भगवत गीता पठणाला होत असलेला विरोध दुर्दैवी! – नितेशे राणे

Aprna

रिया चक्रवर्तीचा हायकोर्टाकडून जामीन मंजूर!

News Desk