HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाक!

मुंबई | टूलकिट प्रकरणावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेसवर आरोप केले आहेत. संकटातही कॉंग्रेस राजकारण करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला बदनाम करण्यासाठी कॉंग्रेसने एक टूलकिट तयार केले असल्याचे संबित पात्रा म्हणाले. दरम्यान, या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी कॉंग्रेवर गंभीर टीका केली आहे.

काय म्हणाले अतुल भातखळकर?

“काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही. ‘इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस, असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा’, असे आदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते”, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

“भारताचा नंबर 1 शत्रू असलेल्या चीनशी काँग्रेस पक्षाचा 2008 पासून करार आहे. त्यामुळे सगळे जग जरी करोनाला चायनीज व्हायरस म्हणत असले तरी काँग्रेस मात्र याला इंडियन व्हायरस म्हणणार. मोदी व्हायरस म्हणणार. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला भरभरून देणग्या दिल्या आहेत त्याची परतफेड नको?”, असा खोचक सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

 

संबित पात्रा काय म्हणाले होते?

महामारीच्या वेळी कॉंग्रेसने ‘टूलकिट’ च्या माध्यमातून सरकारला घेराव घालण्यासाठी अनेक मार्गांनी देशात गोंधळ निर्माण करून राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी महामारीचा उपयोग पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला डागाळण्याची संधी म्हणून केला. कोरोनातील नव्या व्हायरसचे नाव मोदी व्हायरस ठेवण्याच्या सूचना कॉंग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. कॉंग्रेसने परदेशी पत्रकारांच्या मदतीने भारताची बदनामी करण्याचे कसलाही कसर सोडली गेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’ प्रतिबंधक मास्क, टेस्टींग व पीपीई किट्स्, व्हेंटीलेटर्सवरील ‘जीएसटी’ माफ करा

News Desk

राम मंदिर भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारींना दिले

News Desk

भारतीय लष्कर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करणार ?

News Desk