HW News Marathi
महाराष्ट्र

राम कार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी, अतुल भातखळकरांचा शिवसेनेला इशारा

मुंबई । अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करून आता राज्यभरात शिवसेना विरुद्ध भाजप अशीच जुंपली आहे. भाजप युवा मोर्चा कडून आज शिवसेना भवनावर फटकार मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले तर दुसरीकडे शिवसैनिकांकडून काही भाजप पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप देखील करण्यात येतोय. याच वेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.”सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे हे लक्षात ठेवा” असं म्हणतं निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी याबाबत ट्विट केलंय

“राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे काँग्रेस, शिवसेना विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाल आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे हे लक्षात ठेवा.

जय श्रीराम…” असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. “लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा नीटनेटकेपणाने हिशोब ठेवला जातो, शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे, त्यातून एखादी टिपूची ची मजार बांधावी. शिवसेनेच्या जिवावर मंदिर निर्माण सुरू नाही. ” असे देखील अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेस्टच्या कंडक्टरला कोरोनाची लागण, परळ बेस्ट वसाहत पोलीसांनी केली सील

News Desk

संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज, अँजिओप्लास्टी यशस्वी शस्त्रक्रिया

News Desk

कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी मंजूर झाल्याची नितीन गडकरींची माहिती!

News Desk