HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे काम ‘जैसे थे’ ठेवण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद | हिंदुह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम तूर्तास ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. औरंगाबादेतील महात्मा गांधी कॅम्पसमधील प्रियदर्शनी उद्यानामधील अनेक झाडं तोडून स्मारक उभं करण्याची योजना आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील देशमुख आणि न्यायमूर्ती आहुजा यांनी दिले आहेत.

प्रियदर्शनी उद्यानातील झाडं तोडून स्मारक उभं करण्याच्या योजनेला अनेक पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला होता. प्रियदर्शनी बचाव मोहीम सुरु करण्यात आली होती. याची दखल घेत न्यायालयाने कामाची पाहणी केली आणि अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर औरंगाबाद खंडपीठ पुढील निर्णय देणार आहे.

प्रियदर्शनी उद्यानातील 1215 झाडे गेली कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी याआधी जनहित याचिका दाखल केलेली होती. बांधकाम करत असताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते परंतु याचे पुनर्रोपण केले जात नसल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयीची माहिती

प्रकल्पाचा एकूण खर्च – ६४ कोटी

उद्यानाचा परिसर – १७ एकर

पुतळ्यासाठी जागा – १ हजार १३५ चौरस मीटर

फूड पार्कसाठी जागा – २ हजार ३३० चौरस मीटर

म्युझियमसाठी जागा – २ हजार ६०० चौरस मीटर

ओपन एअर स्पेस – ३ हजार ६९० चौरस मीटर

२०२५ साली बाळासाहेबांच्या प्रखर राष्ट्रवादी ज्वलंत हिंदुत्वाची प्रेरणा देणारं स्मारक उभारणार आहोत, हिंदुत्ववादी म्हणजे राष्ट्रीयत्व सांगणारे हे स्मारक असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डिसेंबर २०२० मध्ये केली होती. ज्यांची ओळख रिमोट कंट्रोल म्हणून होती, त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन रिमोट कंट्रोलनेच होणं हा योगायोग आहे. या स्मारकात नुसता पुतळा नसेल तर या स्मारकातून अनेकांना हिंदुत्वाची प्रेरणा मिळेल, असं भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील २६ अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा केला ‘या’ योजनेत समावेश

News Desk

“अक्षयतृतीया आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका,” राज ठाकरेंचे ट्वीट करत कार्यक्रर्त्यांना आवाहन

Aprna

देगलूरमध्ये जितेश अंतापूरकरांना सहानुभूतीची फायदा झाला! – रामदास आठवले

News Desk