HW News Marathi
महाराष्ट्र

शहीद जवान किरण थोरात यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद (जिमाका) | औरंगाबाद जिल्ह्यातील शहीद जवान किरण पोपटराव थोरात, युनिट 4 एमएलआय, राहणार फकिराबाद वाडी, पो. लाडगाव, ता. वैजापूर यांना जम्मु- कश्मीर कृष्णा घाटी सेक्टर येथे पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये वीरमरण आले होते. आज सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात शोकाकुल वातारवणात त्यांच्यावर फकिराबादवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळी 6:30 वाजता लष्करी अधिकारी यांच्यस‍ह 20 जणांच्या तुकडीसोबत अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव औरंगाबाद छावणी येथील सैन्य दलाच्या हॉस्पिटलमधून त्यांच्या वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी या मुळगावी नेण्यात आले. यावेळी त्यांना शासकीय इतमामात 25 इन्प्फंट्री व मराठा लाईट इन्प्फंट्री रेजिमेंटच्या सैनिकी तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.

यावेळी कॅप्टन साकेत शर्मा, मेजर कदम, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ. सुभाष झाबंड, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, सहायक पोलिस अधिक्षक सोमय्या मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल लांजेवार, पोलिस निरीक्षक अनिरूद्ध्‍ नांदेडकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर. जाधव, सहाय्यक गोरे यांच्यासह सैन्यदलाचे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रतिष्ठीत नागरीक व ग्रामस्थांची उपस्थित होती. शहीद जवान किरण थोरात यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संजय राठोड राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला,मुख्यमंत्री स्विकारणार ?

News Desk

“जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा बंदोबस्त करायचाय”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा!

News Desk

NIA झाली आता ‘ED’ची एन्ट्री, महाविकासआघाडी सरकारच्या अडचणीत वाढ?

News Desk
देश / विदेश

नोटबंदी एक अविचारी निर्णय | रघुराम राजन

News Desk

भाजप सरकारच्या काळात घेण्यात आलेला नोंटबंदीचा निर्णय हा एक अविचारी निर्णय असल्याचे मत रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम यांनी व्यक्त केले आहे. केंब्रिजस्थित प्रतिष्ठित हार्वर्ड केनेडी स्कूल येथे बुधवारी एका व्याख्यानात ते बोलत होते.

निश्चलनीकरण ही एक चांगली कल्पना नाही असे आपण सरकारला स्पष्टपणे सांगितले होते. ८७.५ टक्के चलनी नोटा बाद ठरविणाऱ्या या प्रक्रियेची अंमलबजावणी नियोजनाविनाच केली गेली. त्यामुळे तो एक अविचारी निर्णय आणि निष्फळ उपक्रम ठरल्याची टीका रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम यांनी पुन्हा एकदा येथे केली.

चलनी ८७.५ टक्के नोटा रद्द ठरविणे हा अविचार होता असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी वस्तू आणि सेवा कराबाबत आपण अद्याप आशा सोडलेली नाही परंतु ही दुरुस्त न करता येणारी समस्या नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजन म्हणाले, ‘माझ्याकडे सरकारन चर्चेला आले नाही असे मी म्हणणार नाही. परंतु हा प्रस्ताव जेव्हा पहिल्यांदा माझ्यापुढे आला तेव्हाच ही एक चांगली कल्पना नाही असे स्पष्टपणे सांगितले होते.’ असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

Related posts

पद्मनाभस्वामी मंदिराचं व्यवस्थापन आता राजघराण्याकडे

News Desk

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

News Desk

स्वातंत्र्य दिनाच्या आधी दिल्लीत भीतीचे वातावरण

swarit