HW News Marathi
देश / विदेश

खेळाडू, कलाकारांनी केला कठुआ बलात्काराचा निषेध

जम्मू कश्मीर मधील कठुआ येथे ८ वर्षांच्या मुलीवर सामुहीक बलात्कार झाल्यामुळे सोशल मिडीयावर या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक लोक चिडून ट्विटर वर ट्विट करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. शुक्रवारी सोशल मिडीयावर एक वेगळ्या प्रकारचे कॅम्पेन पहायला मिळाले. बॉलीवुड मधील अनेक कलाकारांनी I AM HINDUSTAN, I AM ASHAMED#JUSTICEFOROURCHILD असा हॅश टॅग वापरत या प्रकरणाचा निषेध नोंदवला.

चिमुकलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्यामुळे संतप्त झालेल्या क्रिडा क्षेत्रातील खेळाडू आणि बॉलीवुडच्या कलाकारांनी आपण भारतीय असलो तरी या प्रकरणाची लाज वाटते अशा शब्दात संताप व्यक्त केलाय. कोंकणा सेन शर्मा, कल्कि कोचीन, हुमा कुरेशी, गुल पनाग, विशाल दडलाणी, बादशाह आणि राधिका आपटे, रितेश देशमुख, रेणुका शहाणे, सानिया मिर्जा, अभिषेक बच्चन, फरहान खान यांच्यासह ख्यातनाम खेळाडू अभिनेते अभिनेत्रींनी चिमुरडीला न्याय मिळावा हि सोशल मिडीच्या माध्यमातून निषेध नोंदवत अपेक्षा व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी, आम्ही इथले भाडेकरू नाही | असदुद्दीन ओवैसी

News Desk

आधी महाराष्ट्राचा अपमान आता मोदींकडून शरद पवारांचं कौतुक

Manasi Devkar

इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या, पाकिस्तानची मागणी

News Desk