HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत रिक्षा, टॅक्सीचे भाड ३ रुपयांनी वाढले!

मुंबई | पेट्रोल, डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. शंभरीकडे झेपावलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतींचा परिणाम आता बाजारावर जाणवू लागला आहे. ज्यांची वाहने नाहीत त्यांनाही आता भूर्दंड सोसावा लागणार आहे. मुंबईतील रिक्षा, टॅक्सीने प्रवासी भाड्यात मोठी वाढ केली आहे. यामुळे वाढत्या इंधनाचा फटका आता सामान्य लोकांनाही बसणार आहे.

ऑटो-टॅक्सीच्या कमीतकमी भाड्यामध्ये ३ रुपयांची वाढ झाली आहे. रिक्षाचे आधीचे भाडे हे १८ रुपये होते. आता त्यामध्ये ३ रुपयांची वाढ झाल्याने ते २१ रुपये झाले आहे. तर टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये झाले आहे. या भाडेवाढीचे स्वागत मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईच्या रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी केले आहे. गेल्य़ा ५ वर्षांपासून इंधनाचे दर वाढत होते. त्याशिवाय वाहनाचा मेन्टेनन्स आणि विमादेखील वाढला होता. तरीही भाड्यामध्ये एक पैशाची वाढ झाली नव्हती.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी रिक्षा आणि टॅक्सी यांच्या दरात झालेल्या वाढीसंदर्भात माहिती दिली. तसेच त्यावेळी बोलताना खटुआ समितीच्या शिफारशीनुसार, एमएमआर रिजनमधील रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं सांगितलं. “रिक्षाचे दरात तीन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता रिक्षाच्या पहिल्या टप्प्याला 18 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत.

पुढील प्रत्येक किलोमीटरला १४.२० पैसे मोजावे लागणार आहेत. १ मार्च २०२१ पासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. तसेच टॅक्सीच्या दरात २२ रुपयांऐवजी २५ रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यानंतर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला १६ रुपये मोजावे लागणार आहेत. १ मार्च ते ३१ मेपर्यंत कार्डनुसार हे भाडे आकारता येणार आहे.”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी सरकारचा खासदार उदयनराजेंना धक्का

News Desk

राज्यातील सरकारमधून बाहेर पडावे अशी इच्छा राहुल गांधी यांची नाही, संजय राऊतांचा वडेट्टीवारांना टोला

News Desk

बहुमताविनाही भोकर पं.स. सभापतीपद काँग्रेसकडे उपसभापतीपदाची लॉटरी अपक्षाला?

News Desk