HW Marathi
महाराष्ट्र

हलगर्जीपणामुळे अवनीची शिकार, एनटीसीचा ठपका

नागपूर | अवनी वाघीणची हिची शिकार करण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. यानंतर अवनीच्या शिकारीच्या वेळी हलगर्जीपणा झाला असल्याचा ठपका एनटीसीच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. ढिसाळ नियोजन आणि हलगर्जीपणा यामुळे अखेरीस अवनीला ठार मारावे लागले असे या अहवालात म्हटले होते.

१३ जणांचा बळी घेतल्याचा संशय असलेल्या अवनी वाघिणीला अनेक दिवसांच्या शोधमोहिमेनंतर ठार मारण्यात आले होते. अवनीला ठार केल्यानंतर स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केले असले तरी प्राणीप्रेमी, विविध सामाजिक संघटना आणि विरोध पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. परंतु नॅशनल टायगर कन्झर्वेशन अॅथॉरिटीच्या अहवालामध्येही अवनीच्या मृत्यूला नियोजनातील ढिसाळपणा कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अवनीला पकडण्यासाठी डॉ. कडू. यांनी दिलेला डार्ट २४ तासांत वापरणे आवश्यक होते. मात्र ते ५६ तासांनंतर वापरण्यात आले. त्यामुळे अवनी बेशुद्ध झाली नाही. अखेरीस तिला गोळ्या घातून ठार करावे लागले असे या अहवालात म्हटले आहे.

अवनीला ठार मारल्याप्रकरणी शार्प शूटर नवाब शहाफत अली खान यांच्यावरही आरोप झाले होते. परंतु आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणा-या नरभक्षक वाघीण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. त्या रात्रीही बेशुद्धीचा प्रयत्न झाला. मात्र तिने थेट झडप घातल्याने आमच्या सोबतच्या इतरांचे संरक्षण करण्यासाठी नाईलाजाने तिच्यावर गोळी झाडावी लागली, अशी स्पष्टोक्ती हैदराबाद येथील शार्प शूटर नवाब शहाफत अली खान यांनी काही दिवसांपूर्वी  दिली होती.

 

Related posts

औरंगाबाद महापालिकेत ‘वंदे मातरम’वरून तोडफोड, video

News Desk

एसटी कर्मचा-यांना सहा हजारांपेक्षा जास्त वेतनवाढ मिळणार?

News Desk

१२ जूनपर्यंत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा

News Desk