HW News Marathi
Covid-19

#AyodhyaRamMandir | राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे, रोहित पवारांची भावनिक साद

मुंबई | अनेक दशकांपासून देशात प्रचंड गाजलेल्या अयोध्या राममंदिराच्या प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निकालाने मार्गी लागला. आता लवकरच कित्येकांचे अयोध्येतील भव्य राम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. आज (५ ऑगस्ट) अवघ्या काही मिनिटांत पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या प्रसंगी देशभरात एक उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. “जय जय राम कृष्ण हरी हा जगण्याचा मंत्र असतो. राम आपला एकट्याचा नव्हता, तर तो सगळ्यांचा होता आणि राहणार. राम सगळ्यांचा असण्यातच राम आहेरामाने राम सेतू बांधला आपण प्रभू श्रीरामाचे विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया”, अशा शब्दात रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रोहित पवारांची खास फेसबुक पोस्ट

रामप्रहरापासून आपला दिवस सुरू होतो. जय जय राम कृष्ण हरी हा जगण्याचा मंत्र असतो. रामराम ही एकमेकांच्या ओळखीची खुण असते. साने गुरूजी म्हणायचे, ‘रामराम म्हणताना तू ही राम आणि मी ही राम हे अपेक्षित असतं’. आपण पिढ्यान् पिढ्या असेच वागत आलो आहोत.

राम आपला एकट्याचा नव्हता, तर तो सगळ्यांचा होता आणि राहणार. शेवटचा श्वास घेताना राम म्हणणाऱ्या गांधींजींचा राम, वारकऱ्यांना सामाजिक समता शिकवणारे ज्ञानदेव तुकाराम. आपल्याच शेतात अयोध्या समजून शेतात राबणारा एखादा सखाराम. राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे.

रामाने राम सेतू बांधला आपण प्रभू श्रीरामाचे विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया. जाती धर्माच्या बाबतीत भल्या भल्या पुरुषांच्या मर्यादा दिसून येतात निदान मर्यादापुरुषोत्तम रामाच्या बाबतीत असं होऊ नये.

आजच्या या दिवशी श्रीरामाला एकच प्रार्थना, सबकों सन्मती दे भगवान!!!

रामकृष्णहरी

https://www.facebook.com/RRPspeaks/posts/982779858852423

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

News Desk

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदीत ७ दिवस संचारबंदी

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

News Desk