HW News Marathi
देश / विदेश

#AyodhyaRamMandir : असे दिसणार अयोध्येचे भव्य राम मंदिर ! दिमाखदार रचना

नवी दिल्ली | देशात कित्येक दशकांपासून गाजत आलेला अयोध्या राममंदिराच्या प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निकालाने मार्गी लागला. सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिलेल्या आपल्या निकालात अयोध्या राममंदिर निर्माणाला परवानगी दिली. आज (५ ऑगस्ट) अवघ्या काही तासांत पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. मात्र, बहुचर्चित असे अयोध्यातील हे भव्य राममंदिर नेमके कसे असणार ? कसे दिसणार ? याची देशभरातील लोकांना मोठी उत्सुकता आहे. जाणून घेऊया, अयोध्येतील भव्य राममंदिराची रचना नेमकी कशी असेल ?

असे दिसणार अयोध्येतील भव्य राममंदिर

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे सदस्य कामेश्वर चोपाल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे :

  • अयोध्येतील हे भव्य राम मंदिर ३ मजली असणार आहे.
  • गर्भगृहापासून राम मंदिराच्या कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यापूर्वी ही उंची १२८ फूट इतकी होती. मात्र, आता ती वाढवण्यात आली आहे.
  • राम मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येतील. मंदिराचे दरवाजे संगमरवरी दगडाने बनवण्यात येतील. तर मंदिराला ५ प्रवेशद्वार असतील.
  • राममंदिराच्या सुधारित रचनेनुसार आता ५ कळस असणार आहेत. यापूर्वीच्या रचनेत ३ कळस होते, मात्र आता मंदिराची सुधारित रचना तयार करण्यात आली आहे.
  • विशेष म्हणजे मंदिराच्या उभारणीसाठी लागणाऱ्या दगड शोधण्याचे काम सुरु असून आतापर्यंत मंदिरासाठी ८० हजार घनफूट दगड घडवण्यात आले आहेत.
  • ‘सीता रसोई’च्या जागी सीतेचे मंदिर उभारण्यात येणार आहे.
  • बहुप्रतीक्षित अशा या अयोध्या राम मंदिराच्या निर्माणासाठी तब्बल ३ ते साडेतीन वर्षांचा कालावधी लागू शकतो.
  • राम मंदिर निर्माणासाठी लागणार एकूण खर्च हा अंदाजे ३०० कोटींच्या जवळपास असेल. तर, मंदिर परिसरातील २० एकर जागेच्या सुशोभीकरणासाठी तब्बल १ हजार कोटी खर्च होईल.
  • राम मंदिराची अंतिम रचना निश्चित झाली कि, प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात होणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्यायाला वाचा फोडल्यानं सैनिकाने गमावली नोकरी ?

News Desk

अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस | हार्दिक पटेल

News Desk

विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चौक्सीला ED चा जबर दणका

News Desk