HW News Marathi
Covid-19

‘Asymptomatic कोरोना रूग्णांना घरी पाठवा‘रूग्णालयात जागा उपलब्ध करण्यासाठी पुणे मनपाचा मोठा निर्णय !

पुणे| राज्यात मुंबईमध्ये कोरोना वाढीचा दर स्थिरावला असला तरी पुण्यामध्ये कोरोना रूग्ण सध्या झपाट्याने वाढत आहेत. पुणे शहरात काल(१७जुलै) नव्याने ,७०५ कोरोनाबाधितरुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ३४,०४० झाली आहे. पुण्यात रूग्णसंख्या वाढत असताना हाॅस्पिटल्समध्ये नविन रूग्णांसाठी बेड शिल्लक नसल्याच्या तक्रारी येत आहेत . या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जागा मिळावी, यासाठी आता अत्यंत कडक पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यात खाजगी रूग्णालयांमध्ये बेड्स अडवून बसलेल्या asymptotic रुग्णांना घरी पाठवण्याचेआदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये सामान्य कोरोना रुग्णांना उपचार मिळत नाहीत तर दुसरीकडे खासगी रूग्णालयांमधून अतिसौम्यलक्षणं असलेले रूग्ण अकारण बेड्स अडवून बसल्याच्या तक्रारी आहेत. म्हणूनच खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये कोरोनाबाधित म्‍हणून उपचारघेत असलेल्‍या तथापी, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्‍य लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांचे समुपदेशन करुन त्‍यांना घरीपाठविण्‍यात यावे, असे आदेश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांनी काढलेआहे.

जे रुग्‍ण कोरोनाबाधित म्‍हणून उपचार घेत आहेत आणि कोरोनाची सौम्‍य लक्षणे आहेत किंवा कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र असे रुग्‍णघरी जाण्‍यास नकार देत असतील तर त्‍यांची यादी महानगर पालिका प्रशासनाकडे पाठविण्‍यात यावी, असंही जिल्‍हाधिकारी राम यांनीकळवले आहे.

खाजगी रुग्‍णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेण्‍यासाठी जिल्‍हा स्‍तरावर तपासणी पथक स्‍थापन करण्‍यात आले असून यापथकामार्फत तपासणी करण्‍यात येणार आहे. जर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले किंवा सौम्‍य लक्षणे असलेले रुग्‍ण खाजगीरुग्णालयात आढळून आले तर संबंधित रुग्‍णालयाच्‍या प्रशासनावर साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायद्यानुसार, कार्यवाही करण्‍यात येईल, असा इशाराही जिल्‍हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पहिली ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात, महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

WHO कडून आपत्कालीन लसींच्या यादीत कोवॅक्सिनचा समावेश नाही, लस घेतलेल्या भारतीयांच्या प्रवासाला ब्रेक?

News Desk

आजपासून राज्यभर रात्री ८ नंतर जमावबंदी, राज्याकडून गाईडलाईन जारी

News Desk