HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

डॉ शीतल आमटे- करजगी यांनी आमटे कुटुंबीयांवर केलेले आरोप आणि वाद काय आहे जाणून घ्या…

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि विकास आमटे यांच्या कन्या डॉ शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आमटे कुटुंबीय यांच्यात वाद असल्याची माहिती समोर आली होती. शीतल आमटे यांनी गंभीर आरोप केले होते.

काय आहे नेमक प्रकरण?

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी समाज माध्यमांमध्ये एक चित्रफीत प्रसिध्द केली होती ज्यात त्यांनी आनंदवनातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते.यात आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदनात सांगितल्या प्रमाणे महारोगी सेवा समितीच्या कामावर आणि खासकरून विश्वस्तांवर आरोप केले गेले होते.

या आरोपांनंतर आमटे कुटुंबीयांतर्फे हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या निवेदनात आमटे कुटुंबाने डॉक्टर शीतल आमटे कर्जगी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एवढेच नाही तर डॉक्टर शीतल आमटे करजगी या सध्या नैराश्यात असून मानसिक ताणतणावात आहेत आणि याची कबुली त्यांनी स्वतः देखील दिलेली आहे असे सांगण्यात आलेले आहे. डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी या निवेदनावर सही केलेली आहे.

समाजसेवक बाबा आमटे आणि सुधा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना केली. समाज नाकारत असलेल्या कुष्ठ रोग्यांना त्यांनी आश्रय दिला. त्यानंतर बाबा आमटे यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र विकास आमटे यांनी कार्यभार उचलला. काही काळानंतर विकास आमटे यांचा मुलगा कौस्तुभ आमटे यांना महारोगी सेवा समितीवर नेमण्यात आले. तर विकास आमटे यांची कन्या शीतल आमटे करजगी यांना समितीवर स्थान देण्यात आले. यावरून मुलाकडून मुलीला कारभार दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन शीतल आमटे यांची नेमणूक केली. त्यानंतर महारोगी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांकडून छळ केला जात असल्याचा आरोप एकाने केला होता. ते सर्व आरोप शीतल आमटे करजगी यांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर शीतल आमटे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत आनंदवनातील कार्यकर्ते आणि आमटे कुटुंबीयांवर आरोप केले होते. मात्र तो व्हिडिओ नंतर सोशल मीडियावरून डिलिट करण्यात आला होता.

आमटे कुटुंबियांचा वाद काय?

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्यानंतर त्यांच्या समाजसेवेचा वसा त्यांची दोन मुलं आणि सुनांनी सांभाळला. आमटेंची तिसरी पिढी डॉ. दिगंत-अनिकेत आणि डॉ. शीतल-कोस्तुभ यांनी बाबा आमटे यांचं काम हातात घेतलं. आमटे कुटुंबीयांच्या सर्व सामाजिक संस्था या महारोगी सेवा समितीच्या नावाखालीच काम करतात आणि त्यांचं बँक अकाऊंटही एकच आहे.

२०१६ मध्ये महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारणी जाहीर झाली. यात डॉ. शीतल आमटे-कराजगी आणि त्यांचे पती गौतम कराजगी यांना स्थान देण्यात आलं. याच दरम्यान कौस्तुभ आमटे यांनी महारोगी सेवा समितीच्या सहसचिव पदावरून राजीनामा दिला. पुण्यात पाणीप्रश्नावर काम करण्यासाठी आनंदवनातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं.

दरम्यान डॉ. शीतल आमटे-कराजगी यांना आनंदवनात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पद देण्यात आलं आणि त्यांचे पती गौतम-करजगी यांना अंतर्गत व्यवस्थापक म्हणून जबाबदारी देण्यात आली. मल्टी नॅशनल कंपनीत कामाचा अनुभव असणाऱ्या गौतम यांनी आनंदवनाच्या कारभारात कार्पोरेट कंपनीसारखी आधुनिकता आणि शिस्त स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असल्याच सांगत अनेक नवे नियम लागू केले होते.

Related posts

आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

News Desk

पुन्हा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

अमृता फडणवीसांच्या अमित शाह यांना ‘चाणक्य’ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा!

News Desk