नवी दिल्ली | देशासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. “बाबरी मशीद उध्वस्त करण्यासाठी पूर्वनियोजित कट नव्हता”, असे म्हणत लखनौच्या CBI न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. ६ डिसेंबर, १९९२ सालच्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात भाजपचे अनेक दिग्गज नेते आरोपी होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याणसिंग, विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय आणि साध्वी ऋतंभरा हे मोठे चेहरे या प्रकरणात आरोपी होते. मात्र, आज (३० सप्टेंबर) लखनौच्या CBI न्यायालयाने अशा एकूण ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
Special CBI Court observed that the 1992 Babri Masjid demolition was not pre-planned. https://t.co/dwpyHkDM6X
— ANI (@ANI) September 30, 2020
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात एकूण ४९ आरोपी होते. आतापर्यंत त्यापैकी १७ आरोपींचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित ३२ मुख्य आरोपींबाबतचा निकाल आज लखनौ न्यायालयाकडून जाहीर करण्यात येणार होता. या प्रकरणाचा निकाल जाहीर करताना न्यायाधीश एस. के. यादव यांनी असे स्पष्ट केले आहे कि, “बाबरी मशीद पाडण्याची घटना हा पूर्वनियोजित कट नव्हता. त्या घटनेबाबत कोणताही पुरावा नाही. या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष आहेत. त्याचप्रमाणे, त्यावेळी कारसेवकांना रोखण्याचाही प्रयत्न झाला”, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
All accused in Babri Masjid demolition case acquitted by Special CBI Court in Lucknow, Uttar Pradesh. pic.twitter.com/9jbFZAVstH
— ANI (@ANI) September 30, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.