HW News Marathi
महाराष्ट्र

चिडलेल्या बच्चु कडूंनी स्वयंपाक्याला कानाखाली का मारली ?

अकोला | राज्यमंत्री बच्चु कडू हे नेहमीच सर्वसामान्यांसाठी झगडणारे, नेते म्हणुन ओळखले जातात.एखाद्या व्यक्तिवर अन्याय होत असेल तर बच्चु कडू तो सहन करत नाहीत.असाच काहीसा प्रकार अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घडला. या ठिकाणी रुग्णांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत पालकमंत्री व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तिथे धडक भेट दिली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी एका कर्मचाऱ्याने बच्चु कडूंना उडवा उडवीची उत्तरे दिली,त्यामुळे संतापलेल्या बच्चु कडूंनी या कर्मचाऱ्याच्या कानाखाली लगावली.

नेमके प्रकरण काय ?

अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे सोमवारी जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी अकोल्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर बच्चू कडू अकोला येथील जिल्हा रूग्णालयात कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. या रुग्णालयात कोविड रूग्णांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचे व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी ‘व्हायरल’ झाले होते. त्यामुळे कडूंनी थेट रूग्णालयातील मेसमध्ये जात त्याची तपासणी केली. रूग्णालयातील मेसची जबाबदारी साहेबराव कुळमेथे या कंत्राटदाराकडे आहे. तर याच मेसमध्ये सुनिल मोरे हा कंत्राटी स्वयंपाकी आहे.

यावेळी बच्चू कडू यांनी दररोज तूर आणि मूगदाळ किती लागते असा प्रश्न मेसचे प्रमुख कुळमेथे यांना विचारल्यावर त्यांनी 23 किलो असं उत्तर दिलं. हाच प्रश्न नंतर पालकमंत्र्यांनी जेवण बनवणारे स्वयंपाकी सुनिल मोरे यांना विचारल्यावर त्यांनी आठ ते दहा किलो असं उत्तर दिलं. यानंतर डाळींच्या एका दिवशी 12-13 किलोचा अपहार होत असल्याचं कडू यांच्या लक्षात आल्यानं त्यांचा पारा चढला अन् त्यांनी थेट स्वयंपाकी सुनिल मोरे याच्या कानशीलात लगावली. पालकमंत्र्यांच्या या रूद्रावतारानं मोरेसह उपस्थित सर्वच स्तब्ध होऊन गेलेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री पुण्यात येणार नाहीत!

News Desk

‘वाघ आमच्या इशाऱ्याने चालतो’, वडेट्टीवारांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर 

News Desk

कोकणाचा शाश्वत विकास पूर्ण करणार! – आदित्य ठाकरे

Aprna