HW News Marathi
Covid-19

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

मुंबई | राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. नव्याने कोरोना होणाऱ्यांमध्ये अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. नुकतंच आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. बच्चू कडू यांनी संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केलं आहे.

बच्चू कडूंना यापूर्वीही झाला होता कोरोना

आमदार बच्चू कडू यांना पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी उपचारानंतर ते क्वारंटाईन होते. बच्चू कडू हे अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. ते ‘प्रहार जनशक्ती’ पक्षाचे अध्यक्ष आहेत. सत्तास्थापनेवेळी महाविकास आघाडी सरकारला त्यांनी पाठिंबा दर्शवला होता. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला आणि बाल विकास, कामगार या मंत्रालयांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे अकोल्याच्या पालकमंत्रिपदाचीही धुरा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१२ ऑगस्टला लॉकडाउनच्या विरोधात ‘वंचित’कडून डफली बजाव आंदोलन !

News Desk

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राच्या जनतेला केले कळकळीचं आवाहन  

News Desk

“पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत”

News Desk