HW News Marathi
देश / विदेश

HW न्यूज नेटवर्कच्या दोन्ही महिला पत्रकारांना जामीन मंजूर

नवी दिल्ली । त्रिपुरा हिंसाचाराचं वृत्तकांन करणाऱ्या HW न्यूज नेटवर्कच्या दोन पत्रकार समृद्धी सकुनिया आणि स्वर्णा झा यांना आज (१५ नोव्हेंबर) अखेर जामीन मंजूर झाला आहे. HW न्यूज नेटवर्कच्या दोन्ही महिला पत्रकारांविरोधात त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यातील काक्राबन पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती HW न्यूज नेटवर्कच्या महिला पत्रकारांवर आयपीसी कलम १२० ब (गुन्हेगारी कट), कलम १५३ अ (विविध धार्मिक गटांमधील वैर वाढवणं) आणि कलम ५०४ (शांतता भंग करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत हा एफआयआर दाखल करण्यात आली होता.

दोन्ही महिला पत्रकारांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोर्टाने त्यांना काक्राबन पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. ज्या ठिकणी जेथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही पत्रकारांची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याची माहिती HW न्यूज नेटवर्कचे वकील पिजूष बिस्वास यांनी दिली आहे.

पत्रकार समृद्धी सकुनिया आणि स्वर्णा झा यांना मंजूर झाल्यानंतर HW न्यूज नेटवर्कचे मॅनेजिंग एडिटर सुजीत नायर यांनी ट्वीट करत वकिल पिजूष बिस्वास आणि HW न्यूज नेटवर्कला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

पोलिसांनी सदर एफआयआरमध्ये असा आरोप आहे की, समृद्धी आणि स्वर्णा यांनी उनाकोटी जिल्ह्यातील पॉल बाजार भागात मुस्लिम वस्तीला भेट दिली तेव्हा त्यांनी “हिंदू आणि त्रिपुरा सरकारविरुद्ध भडकावणारी भाषणं/वक्तव्यं” केली. तक्रारकर्त्यांचं असं म्हणणं आहे की, “समृद्धी यांनी पॉल बाजार मशिदीला लागलेल्या आगीमागे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल असल्याचा खोटा उल्लेख केला होता.”

नेमके काय आहे प्रकरण

पत्रकार समृद्धी आणि स्वर्णा या दोघींनी बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांवर झालेल्या हल्ल्यानंतर त्रिपुरा राज्यात उसळलेल्या हिंसाचाराचं वार्तांकन केलं होतं. विश्व हिंदू परिषदेच्या सदस्या कांचन दास यांनी दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे हा एफआयआर दाखल करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सालाबादप्रमाणे CBSE१० वीच्या निकालात मुलींनी मारली बाजी !

News Desk

…तर दाऊद इब्राहिम, सईद सलाउद्दीनला भारताच्या ताब्यात द्या !

News Desk

भारताच्या अर्थव्यवस्थेची भविष्यातील मालकी चिनी कम्युनिस्ट पार्टीकडे असण्यासारखे आहे

News Desk