HW News Marathi
महाराष्ट्र

‘लपून छपून काही होणार नाही, जे होईल ते समोरासमोर’, बाळा नांदगावकरांची माहिती

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज(६ ऑगस्ट) मुंबईत भेट झाली आहे. त्यांच्या या भेटीवरून अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या भेटीचं कारण चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील आता मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जे काय होईल ते समोरासमोर लपून-छपून नाही

मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा रंगात आहेत. वाढत्या भेटीगाठीनमुळे या चर्चांना अजून उधाण आलं आहे. यावर आता मनसेची भूमिका बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केली आहे. “जे काय होईल ते समोरासमोर होईल. बदल हे चांगल्या साठी असतात आणि आम्ही देखील बदल पॉसिटीव्हली घेऊ. जो काय निर्णय आहे तो पक्षश्रेष्टी घेतील. अद्यापतरी दोन्ही पक्ष आपापल्या परीने स्वतः काम करत आहेत. त्यामुळे जे काही निर्णय असतील ते पक्षश्रेष्ठ घेतील”.

नेमकी काय चर्चा झाली?

चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंमध्ये जवळ जवळ ५० मिनिटांची बैठक झाली. या बैठकीमध्ये युतीचा कोणताही निर्णय झालेला नाही तर दोघांच्याही स्वभावावर आणि विविध विषयांवर गप्पा मारल्या. चंद्रकांत पाटील हे आनंदात आले आणि आनंदात गेले, असं बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे नाशिक मध्ये अचानक भेटले आणि राज ठाकरेंनी पुन्हा त्यांना आपल्या घरी चहासाठी निमंत्रित केलं होतं. यात कोणताही राजकीय हेतू नसल्याची गोष्ट बाळा नांदगावकरांनी सांगितली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC Reservation | राज्य सरकारच आता गोळा करणार इम्पिरिकल डाटा

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ७ वाजता कोणती मोठी घोषणा करणार ?जनतेशी साधणार संवाद

News Desk

शिवसेना हिंदुत्वापासून दुर गेली, अमित ठाकरेंचा गंभीर आरोप

News Desk