HW News Marathi
महाराष्ट्र

“आमचा एक आहे पण ‘नेक’ आहे”, बाळा नांदगावकरांची राजू पाटील यांच्यासाठी फेसबूक पोस्ट

मुंबई | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसेला दोन मोठे धक्के बसले. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. साहजिकच मनसे प्रमुख राज ठाकरेंना मोठे धक्के बसल्याची चर्चा झाली. अशा सगळ्या परिस्थितीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील काहीसे बॅकफूटला गेल्याची चर्चा होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजू पाटील यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

कालपासून डोंबिवलीतील काही जणांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आणि त्या प्रवेशांना विविध माध्यमांद्वारे वारंवार दाखविल्यामुळे त्याची बातमी झाली. कोणत्याही संघटनेतून कोणीही गेले तरी संघटना ही कायम कार्यरतच असते. आपल्या पक्षाने या आधीही अनेक मोठ-मोठी पक्षांतरं अनुभवली आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे की कोणीही गेला तरी आपला महाराष्ट्र सैनिक हा राजसाहेबांवर कायमच श्रद्धा ठेवून कार्यरत असतो”, असं नांदगावकर यांनी फएसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“स्थानिक आमदार राजू पाटील व त्यांचे सहकारी हे सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करत असतांना काही जण पक्ष सोडून गेले. परंतु यात निराश होण्याचे काही कारण नाही. जनता सगळे जाणून आहे. आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत पोषक वातावरण आहे. त्यामुळे या गोष्टींना अवास्तव महत्त्व न देता येणाऱ्या निवडणुकीची कसून तयार करावी”, असा मित्रत्वाचा सल्ला नांदगावकर यांनी राजू पाटील यांनी दिला आहे.

“राजू पाटील हे आपले एकमेव आमदार आहेत. लोक अनेकदा म्हणतात की एकच आहे… एकच आहे… आमचा एक आहे पण ‘नेक’ आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील सर्वांना एकच विनंती कि अशा पक्षांतराने अजिबात विचलित होण्याचे कारण नाही. राजू पाटील यांच्या नेतृत्वात आपण कल्याण डोंबिवलीत मोठे यश मिळविणार हे नक्की…”, असा विश्वास सरतेशेवटी नांगदावकर यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘मविआ’चे आमदार आक्रमक

Aprna

‘पूरग्रस्तांना पॅकेज म्हणजे वृत्तपत्रातील प्रसिद्धीची बातमी’, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

News Desk

‘रुपाली चाकणकरांना ओळखत नाही’, नवनीत राणांचं प्रत्युत्तर..!

News Desk