HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपची या ‘चिमण्यांनो परत फिरा’ची साद, आमदार बाळासाहेब सानप  प्रतिसाद देणार?

नाशिक | राज्यात सध्या एका पक्षातील नेते, आमदार, कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाण्याचा सपाटा सुरुच आहे. नाशिक महानरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजप कंबर कसताना दिसत आहे. शिवसेनेचा झेंडा हाती धरलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांना पक्षात परत बोलवण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना असा प्रवास केलेले सानप भाजपच्या हाकेला कसा प्रतिसाद देणार याची उत्सुकता आहे.

एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड असे दिग्गज नेते भाजप सोडून गेले असताना पक्ष आता “या चिमण्यांनो परत फिरा” अशी साद घालताना दिसत आहे. जुन्या-जाणत्या आणि पक्ष सोडून गेलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांना साद घालण्याची प्रक्रिया भाजपने सुरु केली आहे. नाशिकचे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनाही परत पक्षात घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

कोण आहेत बाळासाहेब सानप?

बाळासाहेब सानप हे भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर ठरले होते. 2014 मध्ये नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर सानप यांना विजय मिळाला होता.

‘विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आपण अपक्ष नगरसेवक पवन पवारची भेट घेतली व मदत करण्याची गळ घातली. पवन पवारने आपल्याला निवडणुकीत मदत केली असून, माझ्या विजयात त्याचा मोठा वाटा आहे’ अशी मुक्ताफळं बाळासाहेब सानप यांनी 2014 मधील विजयानंतर उधळली होती.

भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश

सानप यांच्याऐवजी मनसेमधून आलेल्या राहुल ढिकले यांना भाजपने तिकीट दिलं होतं. राहुल ढिकले हे माजी खासदार उत्तमराव ढिकले यांचे पुत्र आहेत. तिकीट डावलल्याने नाराज झालेल्या सानप यांनी भाजपला अलविदा करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला होता. नाशिक पूर्व मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली. विशेष म्हणजे मनसेतून बाहेर पडलेल्या ढिकलेंना पाडण्यासाठी मनसेने या ठिकाणी उमेदवार न देता सानप यांना पाठिंबा दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“… म्हणून कोणीला वाघ होता येत नाही”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Aprna

नवरात्रोत्सवानिमित्ताने “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबवण्याची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Aprna

लातूरमध्ये परिचारक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

News Desk