HW News Marathi
देश / विदेश

“गडकरींसारखा एखादा नेता शिवसेनेतही हवा होता”, बाळासाहेब ठाकरेंना गडकरींची भूरळ का पडली?

मुंबई ​| महाराष्ट्रातले केंद्रात मंत्री असलेले असे भाजपचे एक नेते आहेत ज्यांच्या कामाचे कौतुक फक्त भाजपच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला आहे. ते आहेत केंद्रीय रस्ते आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी. नितीन गडकरी यांचा आज (२७ मे) वाढदिवस आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया नितीन गडकरी यांच्याविषयीच्या काही विशेष गोष्टी.

नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या चांगल्या कामासाठी ओळखले जातात.सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.महाराष्ट्रातील हा नेता पंतप्रधान व्हावा असं खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनाही वाटतं.त्यामुळे विरोधी पक्षात असले तरी गडकरी सगळ्याचे फेवरेट आहेत.

नितीन गडकरींचा उल्लेख ‘पुलकरी’ !

बाळासाहेब ठाकरे यांनाही नितीन गडकरींच्या कामाची भुरळ पडल्याशिवाय राहिली नाही. “नितीन गडकरींसारखा एखादा नेता शिवसेनेतही असायला हवा होता”, अशा शब्दांत बाळासाहेब ठाकरेंनी गडकरींचा उल्लेख केला होता. नितीन गडकरी हे शिवसेना-भाजप युती सरकारच्या 1995 ते 1999 या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्या काळात गडकरींनी मुंबईत सर्वाधिक उड्डाणपूल बांधले होते. गडकरींच्या या कामगिरीनंतर राजकीय वर्तुळात त्यांचा उल्लेख ‘पुलकरी’ म्हणून होऊ लागले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनाही नितीन गडकरींच्या कामाचे प्रचंड कौतुक होते.

नितीन गडकरी यांचा आपल्या कामाप्रति असलेला प्रामाणिकपणा, कामाची पद्धत, वेग आणि रोखठोकपणा हा केंद्रापासून राज्यापर्यंत सर्वांनाच भावतो. देशातील आणि राज्यातील अनेकांची नितीन गडकरी यांनी पंतप्रधान व्हावे अशी ईच्छा आहे. इतकेच नव्हे तर कोरोनाच्या संकटात देशात निर्माण झालेल्या गंभीर स्थिती केंद्रीय आरोग्यविभागाची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे द्यावीत अशी मागणी होत आहे. केंद्रीय स्तरावर गडकरींचे रस्ते व परिवहन खाते कायमच चर्चेत असते. गडकरी हे मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शाह, शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार!

News Desk

अजून एक बँक घोटाळा, व्यापाऱ्याने ३९० कोटीचा चुना लावला

News Desk

उत्तर प्रदेशात ब्राम्हणांवर अत्याचार | मायावती

swarit