HW News Marathi
महाराष्ट्र

वडिलांवरील टीकेला लेकीचं प्रत्युत्तर, पडळकराना थोरातांच्या मुलीचा संस्काराचा टोला

मुंबई । महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षण आणि त्यासोबतच ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस पेटतच चाललाय याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, चार महिन्यात आरक्षण मिळवून देतो नाहीच झालं तर राजकारणातून संन्यास घेईन असं विधान केले होते आणि देवेंद्र फडणवीस यांचं हेच विधान चांगलाच चर्चेचा मुद्दा बनला होता.

याच विधानावर काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले होते, फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं टोला लगावला. यावरच पुन्हा एकमेकांवर टोलवाटोलवीची जणू काही स्पर्धाच लागली. त्यानंतर भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी शेलक्या शब्दात टीका केली. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांना पडळकर यांची भाषा न रुचल्याने पडळकर यांना संस्काराची भाषा शिकवली.

महसूलमंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्याप्रमाणे बरळू लागले आहेत . मूळात देवेंद्र फडणवीस यांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे , याचेही भान यांना राहिले नाही , ” असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी थोरातांना ट्विटर अकाऊंटवरुन निशाणा लगावला होता . त्यानंतर , मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आणि अमृतवाहिनी कृषी शैक्षणिक संस्थेच्या संचालिका शरयू देशमख यांनी पडळकर यांना संस्कारी भाषेत टोला लगावला.

तर पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत . आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती . असो , ज्याचे त्याचे संस्कार .. ! , असे ट्विट शरयू देशमुख यांनी केलं आहे . गोपीचंद पडळकर यांनी आपल्या वडिलांवर केलेली टीका शरयु देशमुखांना सहन न झाल्याने पडळकर यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्येने संस्कारी भाषेत टोला लगावलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला, सुदैवाने दुखापत नाही

News Desk

समीर वानखेडे प्रकरणात NIAची एन्ट्री, वानखेडेंच्या चौकशीसाठी NIA टीम NCB कार्यालयात दाखल

News Desk

“ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त”, फडणवीसांचा टोला

News Desk