HW News Marathi
महाराष्ट्र

तेजस ठाकरे राजकारणात येणार ? वरूण सरदेसाई म्हणतात…

नाशिक। तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. तेजस ठाकरे राजकारणात येतील का? पद घेतील का? हे मला सांगता येणार नाही. मात्र, तेजस ठाकरे जेव्हा स्वत: ठरवतील, पक्षप्रमुखांना वाटेल, तेव्हा ते राजकारणात येतील याबद्दल शंका नाही. ते योग्यवेळी निर्णय घेतील, असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलंय.

तेजस ठाकरेही सक्रिय राजकारणात येणार का?

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा वाढदिवस. त्यानिमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या शुभेच्छांमुळे तेजस ठाकरेही सक्रिय राजकारणात येणार का? असा सवाल विचारला जात आहे. याबाबत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर कान टवकारणारं होतं.

मुंबईचे पालकमंत्री म्हणूनही ते उत्तम काम

आदित्य ठाकरे मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. ते सर्व जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहेत. सर्व शिवसेना नेते, युवा सेना त्यांच्यासोबत आहे. मुंबईचे पालकमंत्री म्हणूनही ते उत्तम काम करत आहेत. आगामी वर्षात युवासेना सिनेटच्या सर्व निवडणुका ताकदीने लढवणार असल्याचंही वरुण सरदेसाई यांनी सांगितलं आहे.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ‘एक घाव दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे’ असंही नार्वेकर यांनी म्हटलंय. इतकंच नाही आदित्य आणि उद्धव ठाकरे हे संयमी आहेत. मात्र, कुटुंबात तेजससारखा एखादा स्फोटक असावाच, असं नार्वेकर म्हणाले. सामनातील जाहिरात आणि बोलताना मिलिंद नार्वेकर म्हणाले, “मी फक्त शुभेच्छा दिल्या आहेत. तो माझा अधिकार नाही. त्यांचं कुटुंब आणि त्यांचा तो अधिकार आहे. विव्ह रिचर्ड्स यांच्या स्वभावावरुन तेजस यांना मी तसं म्हटलं आहे. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. कुटुंबातील एखादा व्यक्ती असा स्फोटक असावा. आदित्य, उद्धव ठाकरे हे संयमी आहेत. कुटुंबातील एखादा स्फोटक असावाच लागतो”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार; कंत्राटदारांवर 4 हजार कोटींची खैरात : धनंजय मुंडे

News Desk

तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत मांडणार

News Desk

‘कोल्हापूरला रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा रद्द’, आदिती तटकरेंची माहिती!

News Desk