HW News Marathi
महाराष्ट्र

लोकसभा निवडणूकीत अप्रत्यक्षरित्या काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली होती…

मुंबई |लोकसभा निवडणुकांच्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारविरोधात घणाघात करत अप्रत्यक्षरित्या काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली होती. या मदतीची जाणीव काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी ठेवलेली दिसत आहे. राज ठाकरेंची लोकसभा निवडणूकीतील कामगिरी पाहता आजही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतील, आपल्या विचारांशी तडजोड करतील असे वाटत नाही, असे ठाम मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

राजकारण आणि चित्रपट-नाटकांचा संबंध जोडत आजचे जग मल्टिस्टार सिनेमाचे आहे आणि आमचा सिनेमा बरा चालला आहे या अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर थोरातांना विचारणा केली असता. नेमकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नेमकं काय विधान केलं माहित नाही. पण आम्ही पाच वर्ष एकत्रित काम करणार आहोत आणि हा मल्टिस्टार सिनेमा यशस्वीही होणार असल्याचा विश्वास बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला. संविधानाच्या चौकटीतच सरकार चालते आणि ते सगळ्यांना बंधनकारक आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि संविधानाची बांधिलकी आहे. देशात संविधानाला धक्का लावण्याचं काम सुरु असल्याचा घणाघात थोरातांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, महाविकासआघाडीतील असंतुष्ट नेत्यांचे प्लॅनिंग | चंद्रकांत पाटील

News Desk

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांचे निधन

News Desk

बेपत्ता नगररचनाकार करपेंच्या 39 बांधकाम परवान्यांची होणार चौकशी

News Desk