HW News Marathi
महाराष्ट्र

“तुम्ही मोठे व्हा काँग्रेसलाही मोठे करा”, बाळासाहेब थोरातांनी धवलसिंहाना साद 

मुंबई | शिवसेना, राष्ट्रवादी असा प्रवास करत अखेर धवलसिंह मोहिते पाटील यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज(२८ जानेवारी) कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. त्यांनी काही महिन्यांपुर्वी करमाळा तालुक्यात नरभक्षक झालेल्या बिबट्याला धवलसिंह मोहिते पाटील यांनी गोळ्ठाया मारुन ठार मारले होते त्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, “जिथं चुकीचं वागाल तिथं असं करावं लागतं. त्या बिबट्याला तसं मारण्याचं कारण नव्हतं पण तो नरभक्षक झाला होता”. त्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्या बिबट्याच्या मस्तकात गोळ्या घालत त्याला ठार केले होते.

पुढे बाळासाहेब थोरात असंही म्हणाले की, “वातावरण कसं तयार करायचं ते धवलसिंहाना नेमकं माहित आहे. तसेच, त्यांच्यात जसं धाडसं आहे तितकीच विनयशीलताही आहे. पुढे त्यांनी असंही म्हटलं की, घटनेचा विचार, कॉंग्रेसचा विचार शाश्वत आहे”, हे लक्षात ठेवण्याचे आवाहनही यावेळी थोरातांनी केले. “चढ उतार येतील, अडचणी येतील पण स्थिर राहा, पुन्हा उभे राहू असा विश्वासही यावेळी थोरातांनी व्यक्त केला. इतक्यावरच न थांबता थोरात म्हणाले की, काँग्रेसला पुन्हा ताकदीने उभे करण्यासाठी तरुण पिढीची गरज. हीच साथ धवलसिहांनी दिली आहे. आता तुम्ही ठरवा आमदारकी करायची, की खासदारकी करायची”.

धवलसिंह मोहिते पाटील यांना बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की, “पहिला सोलापूर जिल्ह्याचा दौरा सुरू करा. जिल्हा परिषद अध्यक्ष काँग्रेसचाच झाला पाहिजे”. आणि धवलसिंह मोहिते पाटलांनी आपल्या मनोगतात म्हटलं होतं की चांगली संधी मिळेल अशी अपेक्षा आहे यावर थोरात म्हणाले की, “तुम्हाला निश्चित चांगल्या संधी मिळतील. आमचा पूर्ण पाठिंबा. तुम्ही मोठे व्हा काँग्रेसलाही मोठे करा”. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये काय बदल होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालक सचिवांनी जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

News Desk

वाहतूक पोलिसांपुढे आता ‘नो वशिलेबाजी’

News Desk

मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

News Desk