HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड ?

मुंबई | लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर अन्य राज्यातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिली. यात महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. यानंतर महाराष्ट्राच्या प्रदेशध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे विरोधक म्हणून ओळखले जाणार थोरात यांनी विखेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस त्यांना विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. थोरात यांच्या खाद्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे. बाळासाहेब थोरात यांनी २००९ मध्ये अहमदनगरमधील संगमनेर मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. यानंतर राज्यात त्यांनी कृषी आणि महसूल मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. थोरातांनी संगमनेरमध्ये अनेक सहकारी शिक्षणसंस्था स्थापन केल्या आहेत. दूध सहकार चळवळीचे ते अग्रणी नेते मानले जातात.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण अद्याप अस्पष्ट

News Desk

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला NCBकडून क्लिनचीट

Aprna

‘१२ आमदारांच्या यादीवर तोंडावर मास्क ठेवलेलचं बरं, पण आमदारकी मिळाली तर आनंदच – मातोंडकर

News Desk