HW News Marathi
महाराष्ट्र

एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

मुंबई | राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, ड्रोन यांच्या वापरावर बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 10 ऑगस्ट 2022 पर्यंत लागू करण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त, संजय लाटकर यांनी कळविले आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरीता हे आदेश लागू आहेत. मात्र, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे अशांसाठी हा आदेश शिथिल असेल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

आ. महेंद्र दळवींच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्यातील पेण मधील शिवसैनिक शिंदे गटात सामील

आ. महेंद्र दळवींच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्यातील पेण मधील शिवसैनिक शिंदे गटात सामील

नितेश राणेंचा गंभीर आरोप, ’राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली आणि आता एकनाथ शिंदे…’

नितेश राणेंचा गंभीर आरोप,’राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली आणि आता एकनाथ शिंदे…’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तोपर्यंत कोणी माझ्या गळ्यात हार घालायचा नाही, फेटाही बांधू नये!’

News Desk

राज्यात लॉकडाऊनच्या काळात एकूण १६१ गुन्हे दाखल तर ३६ आरोपींना अटक, महाराष्ट्र सायबरची प्रभावी कामगिरी

News Desk

अमृता फडणवीसांच्या आमदारकीसाठी भाजपमध्ये दबावतंत्र, शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

News Desk