HW News Marathi
महाराष्ट्र

“कोरोना ही बिल गेट्सची कल्पना” बंडातात्या कराडकरांचे अजब वक्तव्य

बिजवडी | २०२० पासून संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढत आहे. मात्र, कोरोनावर अनेक जणांनी अजब वक्तव्य केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहेत. असेच आणखी एक वादग्रस्त आणि अजब वक्तव्य बंडातात्या कराडकर यांनी केले आहे. गेले वर्षभर कोरोनाचा खेळ खेळणारे सरकार आता कोरोना लस घेण्यासाठी परत एकदा कोरोनाची लाट आल्याचे नाटक करून भारतीयांना फसवले जात आहे.

कोरोनाची कल्पना बिल गेट्सच्या डोक्यांतून निर्माण झाली असून भारतासह अनेक देश बिल गेट्सची खेळणी आहेत. हे जगातील अनेक तज्ञ ओरडून सांगत आहेत. तरीही लोकांचे डोळ्यांत धूळ फेकणे चालू आहे. त्यामुळे कोरोना हा व्हायरस नसून दहशत आहे, असे मत बंडातात्या कराडकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

भारतात प्रतिवर्षी कॅन्सरने मरणाऱ्या रुग्णांची संख्या सरकारी माहितीनुसार साडेसात ते आठ लाख आहे. दारू पिऊन मरणाऱ्यांची संख्या अडीच लाख आहे. असे असतांना फक्त बनावट कोरोनाने मरणाऱ्या रुग्णांची संख्या वाढवून सांगितली जाते. तंबाखू, तंबाखूजन्य व अन्य मादक पदार्थांचे उत्पादन, विक्री व सेवनावर कोणतेही बंधन नाही. यावरून सरकार दांभिक आहे हे सिद्ध होते, असेही कराडकर म्हणाले आहेत.

कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाची लक्षणे ताप, थंडी, सर्दी, कफ, खोकला अशी सामान्य असून तो जीवघेणा रोग नाही. (मुळात कोरोनाच नाही) त्यावर आयुर्वेदांत शेकडो उपाय आहेत. पण सरकार त्या उपायांना प्राधान्य देत नाही. कारण ही औषधे बिल गेट्सची नाहीत. सरकारला नागरिकांना लुटून बिल गेट्सची सेवा करावयाची आहे. म्हणून लॉकडाउनचे नाटक चालू आहे.

यातून जनतेचा उद्रेक झाला तर ती क्रांती असेल आणि नाही झाला तर दुसऱ्या पारतंत्र्याची नांदी असेल असेही बंडातात्या कराडकर यांनी म्हटले आहे. माझे हे वैयक्तिक परखड मत असून यास कुठलाही संप्रदाय व संघटना जबाबदार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुली बाई अॅप प्रकरणी तीन जणांना अटक; कसा लावला छडा? हेमंत नगराळेंनी दिली माहिती

Aprna

सर्व माध्यमात दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

News Desk

‘मुंबईतल्या करी रोड दुर्घटतनेतल्या दोषींवर कारवाई होणार’ – किशोरी पेडणेकर

News Desk