HW News Marathi
महाराष्ट्र

कविता चौतमल पनवेल महापालिकेच्या महापौर

पनवेल-नव्याने अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेच्या पहिल्या महापौर होण्याचा मान भाजपच्या कविता चौतमल यांना मिळाला आहे. महापौरपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. ७८ पैकी ५१ जागा जिंकून त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यामुळे महापौरपदासाठी पक्षाने कविता किशोर चौतमल यांना उमेदवारी दिली. भाजपच्याच चारुशीला घरत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादीनेही सत्ता मिळवण्याचा दावा केला होता. पण त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नव्हते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजभवनात ‘ती’ १२ नावांची यादी सुरक्षित!

News Desk

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं १००व्या वर्षात पदार्पण, राज ठाकरेंकडून खास शुभेच्छा!

News Desk

तीन महिन्यांसाठी वीज तोडणी तात्पुरती थांबवली; नितीन राऊतांची विधानसभेत घोषणा

Aprna