HW News Marathi
देश / विदेश

वेतन वाढीची मागणी अपुर्ण राहिल्याने आजपासून ३ दिवस बॅंकांचा संप

नवी दिल्ली | आज देशाच्या अर्थसंकल्पाचा आढावा घोषित करण्यात येणार आहे तर उद्या १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे अशातच देशातील सर्व सरकारी बँकानी २ दिवसांचा संप पुकारला आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे हाल होणार हे निश्चित आहे. बँक संघटनांनी २० % वेतनवाढीची मागणी केली आहे. आणि या वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीवर कोणतीही सहमती न झाल्याने या संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज (३१ जानेवारी) आणि उद्या (१ फेब्रुवारी) सरकारी बँका बंद राहणार आहेत. या संपात आणखी भर म्हणून रविवार आल्याकारणाने सलग ३ दिवस बॅंका बंद राहणार आहेत.

वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीबाबत आयबीए व्यवस्थापनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाशी चर्चेत कोणत्याही मागणीवर सहमती न झाल्याने बँक कर्मचारी शुक्रवारपासून (३१ जानेवारीपासून) देशव्यापी संपावर गेले आहेत. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचाऱ्यांची वेतन सुधारणा नोव्हेंबर २०१७ पासून प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ दोन दिवस संप होण्याची शक्यता आहे. उद्याच्या अर्थसंकल्पात नेमकी काय मागण्या पुर्ण होतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान दोन दिवसांच्या संपाची घोषणा केल्यानंतर संघटनेच्या प्रतिनिधींची २७ जानेवारीला मुख्य कामगार आयुक्तांबरोबर बैठक झाली पण या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संप कायम राहणार असल्याची माहिती ‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’चे अध्यक्ष सुनील कुमार यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

News Desk

सुशांतची हत्या झालेली नाही, AIIMSकडून शिक्कामोर्तब

News Desk

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच

News Desk