HW News Marathi
राजकारण

दिल्लीत संजय राऊतांच्या घरी मेजवानी..भाजप खासदार जाणार ?

दिल्ली | महाराष्ट्रात सध्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपावरून राजकारण चांगलेचं तापले आहे. या प्रकरणावरून भाजपने आज राज्यपालांची भेट घेतली. दुसरीकडे लोकसभेत भाजपच्या खासदारांनी या मुद्द्यांवरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.या परिस्थितीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत मोठी मेजवानी ठेवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात राऊतांच्या या मेजवानीची चर्चा होऊ लागली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या मेजवानीचे निमंत्रण महाराष्ट्रातील सर्व खासदारांना देण्यात आले आहे.त्यामुळे राऊतांच्या या मेजवानीला महाराष्ट्रातील भाजपचे खासदजार उपस्थितीत राहतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

मेजवानीचा बेत आधीच ठरला होता

जी माहिती मिळत आहे त्यानुसार खासदार संजय राऊतांनी या मेजवानीचे आयोजन काही दिवस आधीच केले होते. तेव्हा महाराष्ट्रात १०० कोटींची वसुली बॉम्ब फुटला नव्हता. राऊतांनी भाजपाच्या खासदारांनाही निमंत्रण दिले होते.

शरद पवार सहकुटुंब, भाजप खासदार येणार?

रात्रीच्या जेवणासाठी संजय राऊत यांनी राज्यातील सर्व खासदारांना बोलावलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार कुटुंबियासह उपस्थित राहणार आहेत. मात्र भाजपचे शिवसेनेशी संबंध बिघडलेले असल्यामुळे भाजपचे खासदार डिनरला उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता आहे.

गायिका मैथिली ठाकूर यांची संगीत मैफील

’15, सफदरजंग लेन’ या संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. संजय राऊत यांचे कुटुंबही दिल्लीतील निवासस्थानी आहे. प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांच्या संगीत मैफलीचेही आयोजन करण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री शिवसेनेचाच, राष्ट्रीय राजकारणावरही भगव्याचाच वरचष्मा असेल !

News Desk

गांधीजींच्या हत्येचे समर्थन करण्याचा प्रश्चच येत नाही, अनंतकुमार हेगडेंचा घुमजाव

News Desk

“मी मुख्यमंत्री पदी नको, समोर येऊन सांगा मग…,” मुख्यमंत्र्यांचे एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन

Aprna