HW News Marathi
राजकारण

सिद्धार्थ कॉलनीतील वीजपुरवठा पूर्ववत सुरू, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

मुंबई | चेंबूर च्या सिद्धार्थ कॉलनीतील वीज बिलाच्या थकीत रक्कममुळे रिलायन्स एनर्जी ने वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे सिद्धर्थ कॉलनीतील रहिवासीयांचे हाल होत होते. या प्रकरणी येथील हौसिंग फेडरेशनच्या राजू वाघमारे आणि अन्य रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन या प्रकरणी सिद्धार्थ कॉलनीतील राहिवाश्यांना वीजपुरवठा। पूर्ववत करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली. या प्रकरणी रामदास आठवलेंनी तातडीने सूत्रे हलवून स्थानिक राहिवासीयांच्या शिष्टमंडळ आणि लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक आयोजित केली. संसदेत महत्वाचे काम असल्याने या बैठकीस रामदास आठवले उपस्थित राहू शकले नाहीत.

मात्र स्थानिक खासदार राहुल शेवाळे हे या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या बैठकीस उपस्थित राहिले तसेच रिपाइंच्या वतिने राजू वाघमारे; रामदास आठवलेंचे स्वीय सहाय्यक प्रवीण मोरे स्थानिक विकासक व रहिवासी प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून राहिवासीयांबद्दल सहानुभूती दाखवीत सिद्धर्थ कॉलनीचा बंद केलेला वीजपुरवठा त्वरित पूर्ववत सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी रिलायन्स एनर्जीला दिले. याबद्दल राहिवासीयांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आणि खासदार राहुल शेवाळे यांचे आभार मानले आहेत. सिद्धार्थ कॉलनीतील गेल्या 4 दिवसापासून रिलायंस एनर्जीने वीजपुरवठा खंडित केला होता . तो पूर्ववत चालु करण्यासाठी सिद्धार्थ कॉलनी विकास सेवा संघ ( हाउसिंग फेडरेशन)चे कार्यकर्ते युद्धपातळीवर प्रयत्न करीत होते . त्यामुळे रात्रीच्यावेळी वीजपुरवठा चालु होत होता परंतु आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले व खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेवून खासदार राहुल शेवाळे , राजू वाघमारे यांनी सिद्धार्थ कॉलनीची कैफियत मांडून रिलायंस एनर्जीच्या मनमानी कारभाराबद्दल मुख्यमंत्र्यांना सांगितले .

मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब रिलायंस एनर्जीच्या उच्चअधिकाऱ्यांना वीजपुरवठा पूर्ववत सुरु करण्याचे आदेश दिले. प्रसंगी मान. खासदार राहुल शेवाळे , आठवलेंचे सचिव प्रवीण मोरे; ज्यांनी सिद्धार्थ कॉलनीचे साडेदहा कोटी रुपये विजबिल भरलेले आहे ते विकासक: अमितभाई रूपारेल – लोकेशभाई खंडेलवाल , राजू वाघमारे व प्रमुख कार्यकर्ते हे उपस्थित होते . गेल्या 4 दिवसात वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे , अविनाश महातेकर, आमदार प्रकाश फातर्पेकर ,अनिलभाई चौहान , नगरसेविका आशाताई मराठे डि. सी. पी. उमाप मान. ए. सी . पी.मोरे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले या मान्यवरांनी अत्यंत काळजीने प्रचंड प्रयत्न केले .या सर्व मान्यवरांचे अगदी मनापासून आभार सिद्धार्थ कॉलनीच्या राहिवासीयांतर्फे येथील हौसिंग फेडरेशन ने मानले आहेत अशी माहिती राजू वाघमारे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत चौकशीसाठी हजर राहणार?

Aprna

व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे अडचणीत आल्या किरण खेर आयोगाने पाठविले नोटीस

News Desk

मनसेला सोडून गेलेल्या सहा नगरसेवकांचा दोन दिवसांत होणार फैसला

News Desk