HW News Marathi
महाराष्ट्र

परळीतील बार्टीच्या विद्यार्त्यांचे १० व्या दिवशी साखळी उपोषण स्थगित; धनंजय मुंडेंचे आश्वासन

बीड | बार्टीचे विद्यार्थी गेल्या १० दिवसापासून सामाजिक न्यय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडें यांच्या आश्वसना दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आहे. विद्यार्थ्यांचे उपोषण हे परळी वैजनाथ येथे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात साखळी उपोषण सुरू होते. विद्यार्थ्यांच्या उपोषणाच्या ३ दिवशी धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना धावती भेट घेतली होती. आणि या अधुऱ्या भेटीने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरल्याचे उपोषण कर्त्यांची माध्यमांशी बोलतांना म्हटले होते. मात्र आज (२ जानेवारी) विद्यार्थ्यांच्या उपोषणाला १० व्या दिवशी धनंजय मुंडे यांनी खास वेळ काढत उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे व मागण्यां ऐकून घेतले आहे. 

धनंजय मुंडेंनी विद्यार्थ्यास सकारात्मक निर्णय दिल्याने विद्यार्थ्यांनी तूर्तास ६ जानेवारीपर्यंत हे साखळी उपोषण मागे घेतले असून ६ तारखेस मागण्या मान्य झाल्यात हे उपोषण रद्द होणार अन्यथा मागण्या मान्य झाल्या नाही तर ७ तारखेला हे उपोषण आणखी तीव्र स्वरूपाचे होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिले आहे. १९४ विद्यार्ध्यांचे भवितव्य हे ६ जानेवारीच्या बैठकीवर अवलंबाऊन असून कोणता निर्णय होणार याकडे संबंध राज्याचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा किरोनाची लागण झाली. याबद्दल धनंजय मुंडेंनी बहीण पंकजा मुंडे यांची मेसेजद्वारे त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचे धनंजय मुंडेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; पुढील शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार

Aprna

“वरुण सरदेसाई आता आला, तर माघारी जाणार नाही” केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ईशारा!

News Desk

“गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकलेत!”, देवेंद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर निशाणा

News Desk