HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात बत्तीगुल पण वीज मंत्र्यांच्या घरात झगमगाट, उर्जामंत्र्यांच्या घरातील झगमगटावर भाजप आक्रमक

मुंबई | राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. वाढीव वीज बिलावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळाली आहे. याच मुद्यावरुन राज्याचे उर्जामंत्री नितिन राऊत यांच्यावर भाजपने टीका केली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घर आणि कार्यालयातील झगमगाटावरुन भाजपने आरोपांची सरबत्ती केली आहे. आमची तिजोरी रिकामी म्हणून बोंबाबोंब करणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा नमुना पाहा, असं ट्वीट भाजपने केलं आहे.

भाजप महाराष्ट्र या अधिकृत पेजवरुन नितीन राऊत यांच्या घराचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये नितीन राऊतांच्या घराच्या आत दिव्यांचा झगमगाट पाहायला मिळत आहे. “आमची तिजोरी रिकामी म्हणून बोंबाबोंब करणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा एक नमुना… हे घर आणि कार्यालय आहे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं” असे ट्वीट भाजपने केले आहे. “या ऐषोरामात अजून काही कसर बाकी असल्यामुळे गोर-गरीब, शेतकरी आणि सामान्यांची वीज तोडण्याची जोरदार मोहीम राज्यात सगळीकडे सुरू असावी !” अशी टीकाही भाजपने केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल प्रवासाच्या वेळेत दिलासा मिळण्याची शक्यता, आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत 

News Desk

“मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारनं करून घेऊ नये” – विनोद पाटील

News Desk

“उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही”, फडणवीसांचा राऊतांना टोमणा

News Desk