HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

सर्वसामान्य कार्यकर्ता झाला गोकुळचा संचालक, बंटी पाटलांच्या या विश्वासाने बयाजी शेळकेंना अश्रू अनावर

कोल्हापूर | आज (४ मे) गोकुळच्या निवडणूकीचा निकाल जाहीर होत आहे. जवळजवळ २५०० कोटींची उलाढाल असणाऱ्या गोकुळची निवडणूक यंदा अधिक चर्चेत आहे कारण महाविकासआघाडीचे आमदार, खासदार एकत्रितपणे कामाला लागले आहेत. दुसरीकडे भाजपनेही आपल्या सगळ्या नेत्यांना कामाला लावले आहे. गोकुळ दूध संघाचा संचालक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक मानाचं पद समजलं जातं.

या पदासाठी तितक्याच ताकदवान व्यक्तीची वर्णी लागत असल्याचे आजपर्यंत चित्र आहे. बयाजी शेळके यांच्या रुपाने कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता गोकुळच्या संचालक पदापर्यंत पोहोचला आहे. पालकमंत्री सतेज पाटीलयांनी शेळकेंना तिकीट दिलं होतं.

बहुप्रतीक्षित गोकुळ दूधसंघ निवडणुकीची मतमोजणी होत आहे. पश्चिम महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता येणार? हे दिवसअखेर स्पष्ट होईल. विरोधी आघाडीतून काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या पॅनलची घोडदौड सुरु आहे.

भटके-विमुक्त प्रवर्गातून बयाजी शेळके यांनी ३४६ मतांनी विजय मिळवला होता. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता आज गोकुळच्या संचालक पदापर्यंत पोहोचलाय. पालकमंत्री सतेज पाटील यांनी शेळके यांना उमेदवारी दिली होती. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना शेळके यांना आपल्या भावना अनावर झाल्या.

गोकुळसाठी रविवारी चुरशीने ९९.७८ टक्के इतकं झालं आहे. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

पहिल्याच निवडणुकीत शौमिका महाडिक विजयी

सर्वसाधारण महिलांमध्ये सतेज पाटील गटाच्या अंजना रेडेकर विजयी झाल्या, तर महाडिक गटाकडून भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आणि महिला प्रवर्गात सत्ताधारी गटाच्या उमेदवार शौमिका महाडिक ४३ मतांनी विजयी झाल्या आहेत.

महाडिक कुटुंबियातील उमेदवार विजयी झाल्याने जल्लोष केला जात आहे. शौमिका यांना पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली होती. महादेवराव महाडिक आघाडीने खातं उघडल्यानंतर विरोधी गटाकडून फेर मतमोजणीची मागणी केली जात आहे.

Related posts

मराठा समाजाच्या रोषाला हे लोक जबाबदार…

News Desk

#21daysLockdownIndia : जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील!

अपर्णा गोतपागर

मुंबईत थांबलेल्या कर्नाटकातील आमदारांच्या हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शने

News Desk