HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण; ‘काळजी घ्या’ संजय राऊतांचे ट्वीट

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिदी दिली. “काळजी घ्या.आपल्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम पडो,” असे ट्वीट शिवसेनेचे खासदार संजय राऊत फडणवीसांना कोरोना झाल्याचे कळाल्यानंतर केले. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 

फडणवीसांनी ट्वीटमध्ये काय म्हटले, “मला कोरोनाची लागण झाली असून सध्या मी होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्लानुसार कोरोनावरील औषधे आणि उपचार सुरू आहेत. जे कोणी माझ्या संपर्कात आलेत, त्यांनी देखील कोरोना चाचणी करून घ्याव. सगळ्यांनी काळजी घ्यावी.” ताप आल्याने फडणवीसांनी लातूर ते सोलापूर दौरा अर्धवट सोडला होता. फडणवीसांचा सोलापूर दौरा हा आगामी राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा होता. या भेटीदरम्यान फडणवीसांना दोन अपक्ष आमदारांचे मत भाजपच्या बाजूनने वळवण्याचा प्रयत्न करणार होते. परंतु, फडणवीस काल (४ जून) ताप आल्यामुळे कोरोना चाणणी केली. यानंतर कोरोनाचा अहवाल लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी हा दौरा रद्द केला.

सध्या देशासह राज्यात कोरोना पुन्हा डोकेवर काढत आहे. देशात गेल्या २४ तासात ३ हजार ९६२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगाना आणि कर्नाटकमध्ये दररोज कोरोना रुग्णांच्या संख्ये वाढ होत आहे. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता कार्तिक आर्यन या दोघांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुलजी गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन म्हणजे हीन राजकारण! – बाळासाहेब थोरात

Aprna

कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका – अजित पवार

News Desk

दहा लाख रूपये घेऊन तिकीट कट -सोशल मीडियावर विडीओ वायरल

News Desk