HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेच्या टीकेला बहीण प्रीतम मुंडेंच सडेतोड प्रतिउत्तर!

बीड। बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मुंडे बहीण भावात पुन्हा एकदा चांगलंच राजकारण तापले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यात माफियाराज सुरुय आणि याविषयी स्वतंत्र बैठक घ्यावी. अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली होती, आणि त्यानंतर विधानसभेच्या सभागृहात देखील बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चांगलेच रणकंदन झालं.

तर यावर बीडमध्ये मीडियाशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, की माझ्यावर टीकेला सुरुवात झाली, माझी बदनामी सुरू आहे. याचा अर्थ निवडणुका जवळ आल्यात. भलेही माझी बदनामी करा, मात्र जिल्ह्याचे नाव बदनाम करू नका, ते सहन केलं जाणार नाही. असं म्हणत धनंजय मुंडे नाव न घेता पंकजा मुंडेंवर टीका केली होती. मात्र आता धनंजय मुंडेंच्या टीकेला, बहिण खासदार प्रीतम मुंडे यांनी चांगलंच प्रत्युत्तर देत, बंधू धनंजय मुंडे यांच्याविषयी एकप्रकारे पाडाच ट्विट करत व्यक्त केलाय.

खासदार प्रीतम मुंडे यांनी ट्विट मध्ये म्हटलंय की

” पक्षांतर्गत अडचणीत असल्यामुळे

बीड चा बिहार करणारे आमचे बंधू बहीणींवर टिका करुन फुटेज मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. हे ठाऊक असुनही त्यांच्या टिकेला ऊत्तर देणं क्रमप्राप्त आहे.”

“जगमित्र कारखान्याच्या नावाखाली एक पत्र्याची पाटी लावून शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणारे, जगमित्र सुतगिरणी वर कर्ज करुन स्वतः जप्तीत गेलेले ,

परळीत नको ते ऊद्योग करुन व्यापारी बांधवांना दहशतग्रस्त करणारे

आज सकाळी जिल्ह्यातील

ऊद्योगांच्या बतावण्या करत आहेत…

घोर कलयुग !” असं बैल प्रीतम मुंडे यांनी ट्विट करत धनंजय मुंडे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे!

दरम्यान बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरून मुंडे बहीण भावात सध्या राजकारण चांगलंचं तापलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर, विधानसभा सभागृहात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला आहे हे दाखवून दिलं. त्यामुळ आता धनंजय मुंडे पक्षांतर्गत अडचणीवर कशी मात करणार आणि मुंडे बहिण भावांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सुरू झालेलं राजकारण, आता काय रंग घेणार ? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये जमावबंदीत शाही पार्टीची दावत; नियमांना हरताळ!

News Desk

इंदोरीकर महाराजांनी वकिलामार्फत पीसीपीएनडीटी नोटीशीला दिले उत्तर

News Desk

नव्या कोरोनाला रोखण्यासाठी सामनातून केंद्र सरकारला सल्ला!

News Desk