HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमयच

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफी !

– राधाकृष्ण विखे पाटील यांची सरकारवर टिका

मुंबई कर्जमाफीची रक्कम 1 ऑक्‍टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची सरकारची घोषणा फोल ठरली असून, दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासनही सरकार पाळू शकलेले नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधःकारमय करणाऱ्या या सरकारला आता शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचाही नैतिक अधिकार राहिलेला नाही, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

कर्जमाफी बाबत सरकार उदासीन असल्याचंही ते म्हणाले. दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने आता घुमजाव केले आहे. बॅंकांकडून माहिती न आल्यामुळे दिवाळीपूर्वी कर्जमाफी शक्य नसल्याचे सहकार मंत्र्यांनी म्हटले आहे असं विखे पाटील म्हणाले. राज्‍यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा दिमतीला असताना सरकार शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती जमा करू शकत नसेल तर हे सरकारचे राज्यावर नियंत्रण नसल्याचे प्रतिक आहे. विखे पाटील यांनी आणखी सरकारवर जोरदार हल्ला करत हे सरकार केवळ घोषणाबाजी करून वेळ मारून नेण्‍याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याच बरोबर राज्‍यात लोडशेडींग करून अंधारात लोटणाऱ्या सरकारला आता नागरिकांनाही दिवाळीच्‍या शुभेच्‍छा देण्‍याचा नैतिकअधिकार ही राहिलेला नाही, असे विखे पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

भाजपच्या बॅनरला शिवसेनेकडून बॅनरनेच उत्तर!

News Desk

राणेंच्या अटकेविरोधात भाजपचे नेते राजभवनावर दाखल!

News Desk