HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चा विरोधातली याचिका मागे, समन्वयकांनी घेतली तोडफोडीची दखल

मुंबई | मराठा क्रांती मोर्चाच्या विरोधात दाखल केली गेलेली याचिका मागे घेण्यात येणार असल्याची माहिती याचिकाकर्ते द्वारकानाथ पाटील आणि त्यांचे वकील आशिष गिरी यांनी दिली आहे. याचिकाकर्ते द्वारकानाथ पाटील यांच्या म्हणण्यानुसार हि याचिका १३ ऑगस्टला मागे घेण्यात येणार असल्याचे वकील गिरी यांनी सांगितले. मराठा मोर्चाच्या समनव्यकांनी ह्या तोडफोडीची दखल घेऊन पुन्हा मराठा आंदोलक रस्त्यावर उतरणारा नसल्याचे जाहीर केल्याने आपल्या याचिकेचा मुख्य हेतू साध्य झाल्याने आम्ही हि याचिका मागे घेणार असल्याचे द्वारकानाथ पाटील यांनी सांगितले.

पुणे, औरंगाबाद आणि लातूर येथे मराठा क्रांती मोर्चाने घेतलेल्या हिंसक वळणाविरुद्ध कारवाई करण्यात यावी तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केलेल्यांवरहि कारवाई व्हावी अशी मागणी करणारी याचिका ९ ऑगस्ट ला मुंबई उच्चं न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

HW Exclusive : एसटी कर्मचाऱ्यांनी १० तारखेपर्यंत कामावर रुजू व्हा, अनिल परबांचे अल्टिमेटम

Aprna

सुशांतच्या आत्महत्येवर मीडियात होणारी चर्चा आश्चर्यकारक, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याकडे मिडियाचे लक्षच नाही

News Desk

राज्याला २६ नव्हे तर ५० हजार दिवसाला रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – नवाब मलिक

News Desk
देश / विदेश

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्याविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद

swarit

नवी दिल्ली | केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आसाममधील नगांव जिल्ह्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिकारांच्या म्हणण्यानुसार हि घटना आठ महिन्यांपूर्वीची आहे. या गुन्ह्याचा पोलीस तपास करीत आहेत. पीडित महिलेचा जबाब घेण्यात आला असून त्यांनी वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे.

गोहेन यांच्या विरुद्ध तक्रार आल्यानंतर २ ऑगस्टला गुन्हा नोंदवून घेतल्याची माहिती नगांव पोलीस उपाधीक्षक संबिता दास यांनी माध्यमांना दिली. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार कलम ४१७(फसवणूक), ३७६ (बलात्कार), ५०६(धमकी देणं) लावण्यात आले आहे.

Related posts

राष्ट्रगीताचा अवमान कराल तर ३ वर्ष शिक्षा  

News Desk

“मोदी आहेत आंबेडकरवादी…मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत मोदी?” आठवलेंची नवी कविता

News Desk

उर्मिला मातोंडकरांचा मोदींवर निशाणा!

News Desk