HW News Marathi
देश / विदेश

“मोदी आहेत आंबेडकरवादी…मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत मोदी?” आठवलेंची नवी कविता

मुंबई । राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोदींना शह देण्यासाठी रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आता आपल्या खास शैलीत पंतप्रधान मोदी यांची पाठराखण करत प्रशांत किशोर यांच्यासह विरोधकांवर निशाणा साधला आहे.

रामदास आठवले आपल्या मुंबईतील ‘संविधान’ निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी कविता करून विरोधकांना इशारा देत मोदींची पाठराखण केली आहे. रामदास आठवले म्हणाले,

“प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी….

2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी….

नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी…

मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी?” दरम्यान, रामदास आठवले यांची खास शैलीतली फटकेबाजी कायमच चर्चेत असते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उर्मिला मातोंडकरांचा मोदींवर निशाणा!

News Desk

शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार

News Desk

आसाममध्ये गोमांस विक्रीच्या संशयातून जमावाकडून एका मुस्लिम व्यक्तीला जबर मारहाण

News Desk