HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांनो खबरदार …

मुंबई | महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्या तळीरामांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या तळीरामांना सहा महिने तुरुंगवास किंवा १० हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या गड किल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी गृहविभागाने हा निर्णय घेतलाय.यासंबंधीची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

राज्यात सुमारे साडे तीनशे गडकिल्ले आहेत. मात्र काही जण याला पिकनीक स्पॉट समजून दारू पार्ट्या करतात. यापूर्वी अनेक वेळा अशा तळीरामांना शिवप्रेमींनी चोप दिल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा तळीरामांना आवर घालण्यासाठी आणि गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी गृहविभागानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णया अंतगर्त गडकिल्ल्यांवर दारु पिऊन गैरवर्तन करणाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दहा हजारांपर्यंत दंड होणार आहे.गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्याच्या उद्देशाने या शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतुन स्वागत होत आहे.

Related posts

शिर्डीत शेतक-याला पोलिसांनी केली बेदम मारहान

News Desk

मनसेचा झेंडा हटवला गेला….मनसैनिक कोणता झेंडा घेणार हाती ?

Arati More

रुपयाचे मुल्य घसरले, उद्धव ठाकरेंचे सरकारवर टिकास्त्र

News Desk