HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी #KaroNaSalaam अभियानाचे कौतुक केले

मुंबई | २०१९च्या नोव्हेंबर महिन्यापासून संपूर्ण जग हे कोरोनाच्या म्हणजेच कोविड-१९ च्या अंधारात आहे. हिंदुस्थानात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये मार्च २०२० नंतर अचानक वाढ झाली होती.या विषाणूची साखळी तोडण्यासाठी सर्वसामान्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची संकल्पना राबविण्याचे आवाहन भारत सरकारने केले होते. दरम्यान, जेव्हा आपल्यापैकी बहुतेक लोक आपापल्या घरांमध्ये सुरक्षित होते तेव्हा काही लोक या परिस्थितीचा मुकाबला करत त्यांच्या घरी न जाता बाहेर काम करीत होते. ही मंडळी म्हणजे आपले डॉक्टर, रुग्णालयाचे कर्मचारी, पोलिस अधिकारी, पालिकेची कर्मचारी आणि आपल्याया दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तू पुरवणारे विक्रेते.

ही सगळी परिस्तिथी व हेच आपले खरे ‘योद्धा’ आहेत हे लक्षात घेत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूमार्फत प्रेरणा मिळवून, एवरीमिडिया टेक्नोलोजीस चे गौतम ठक्कर, भाजपच्या युवा नेत्या सायली कुलकर्णी, मुंबई अनसेंसर्डचे सिद्धांत मोहित नि लेओ क्लबचे श्वेतांक महेश्वरी यांनी एकत्र येत #KaroNaSalaam अशी एक अभियान राबवली. आपल्या ‘कोविड योद्धांना’ मनापासून सलाम करीत प्रोत्साहन देणे हे या मोहिमेचे मुळ उद्दिष्ट आहे. त्यांचे कौतुक राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

देशभरात ही मोहीम प्रचंड गाजली व २९ नोव्हेंबर २०२० पर्यंत एक लाखाहून अधिक नोंदी या अभियाना द्वारे झाल्या होत्या. #KaroNaSalaaच्या टीम ने काही दिवसांपूर्वी या मोहिमेचा एक छोटासा व्हिडिओ महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांच्यासमोर सादर केला. राज्यपालांनी या अभियानाचे कौतुक केले आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावीपणे वापर केल्याबद्दल या टीमला दाद देखील दिली. या अभियानाला पाठिंबा देण्यासाठी प्रख्यात कलाकार आणि जाहिरात-गुरू श्री. भारत दाभोळकर, ज्येष्ठ पत्रकार श्री. दिलीप चावरे, आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. रघुनाथ कुलकर्णी आज राजभवनात उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक

News Desk

भाजपच्या आमदार-खासदारांना मुख्यमंत्र्यांनी दिले ‘रिपोर्ट कार्ड’

News Desk

“तर ते राज्याचं दुर्भाग्य आहे”, सुधीर मुनगंटीवारांनी दर्शवली नाराजी

News Desk