HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांनी अनोख्या पद्धतीने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

मुंबई | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला दीपावली सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सणाचा आनंद घेताना कोरोना नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. “दिवाळीच्या आनंदात किमान एका गरीब-उपेक्षिताला सामावून घ्या, असा अनमोल संदेश देताना कोरोनाचे गंभीर आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळी सुरक्षित, पर्यावरणयुक्त व प्रदुषणमुक्त वातावरणात साजरी करावी”, असं राज्यपालांनी म्हटलंय.

“दीपावलीच्या मंगल पर्वावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. कोरोनाचे गंभीर आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळी सुरक्षित, पर्यावरणयुक्त व प्रदुषणमुक्त वातावरणात साजरी करावी. दिवाळीच्या आनंदात किमान एका गरीब व उपेक्षित व्यक्तीला सामावून घेतल्यास ही दिवाळी खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होईल”, असं ते म्हणाले. यंदाचा प्रकाशोत्सव सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो, अशी प्रार्थनाही राज्यपालांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही मोठे व्हा काँग्रेसलाही मोठे करा”, बाळासाहेब थोरातांनी धवलसिंहाना साद 

News Desk

गलिच्छ स्तराच्या राजकारणामुळे अजित पवारांनी दिला राजीनामा | शरद पवार

News Desk

परदेशवारी न करताही कोरोना पॉझिटिव्ह ?

swarit