मुंबई | आम्हाला हा विश्वास आहे की एक दिवस कराचीदेखील भारतात असेल, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या याच वक्तव्यावरुन काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.
फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा, मग कराची आपलीच, असे म्हणत भाई जगताप यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा, कराचीकर घरदार सोडून पळून जातील. मग कराची आपलीच, असं ट्विट भाई जगताप यांनी केलं आहे. दरम्यान, अमृता फडणवीस यांना अनेकांनी गाण्यावरून टोमणे मारले आहेत.
फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा
कराचीकर घरंदारं सोडून पळून जातील.
मग कराची आपलीच!
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) November 24, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.