HW News Marathi
महाराष्ट्र

‘रस्त्यावर लोळणाऱ्यांची दातखिळी बसली का?’, भाई जगतापांनी पडळकरांना डिवचले

मुंबई | कोरोनामुळे राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने २७ जूनला होणारी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा स्थगित केली आहे. गुरुवारी याबाबत परिपत्रक काढण्यात आलं. आता ही परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे. यावरुन काँग्रेस नेते भाई जगताप यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केलं आहे.

गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा रद्द केल्यानंतर पुण्यातील रस्त्यावर झोपून आंदोलन केले होते. त्यामुळे, विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात मोठा सहभाग घेतला. त्यानंतर, एमपीएससीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता युपीएससीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

एमपीएससी परीक्षा स्थगित केल्यानंतर गोंधळ घालणारे आता कुठे गेले? असा थेट सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे. यावर त्यांनी एक ट्वीट करत ही टीका केली आहे. खरंतर, एमपीएसी परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहे. त्यावर भाई जगताप यांनी भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे भाई जगताप यांचे ट्विट?

भाई जगताप यांनी ट्वीटमध्ये लिहलं आहे की, ‘राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे, केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत? आता दातखिळी बसली आहे का??’ अशा शब्दात जगताप यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. आता यावर गोपीचंद पडळकर काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

 

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने राज्य सेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली. अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठी नाराजी आहे. पुणे येथे उमेदवार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. परीक्षा स्थगित करू नये अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सारथी’च्या माध्यमातून तरूणांच्या सर्वांगीण विकासाला मिळेल चालना! – मुख्यमंत्री

Aprna

दूध आंदोलनासाठी काढलेला भाजपचा मुहूर्त चुकला – हसन मुश्रीफ

News Desk

“तालिबानींपेक्षा ही भयंकर तालिबानी हे लोकं ”, आशिष शेलारांचं विधान

News Desk