HW News Marathi
महाराष्ट्र

एवढी मस्ती ? तुमचं शिवाजी महाराजांबद्दलचे बेगडी प्रेम आम्हाला ठाऊक आहे !

मुंबई | राज्यसभेच्या नव निर्वाचित खासदार यांनी काल (२२ जुलै) खासदारकीची शपथ घेतली. भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी देखील काल दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. मात्र, त्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

भाजपला शिवाजी महाराज केवळ निवडणुकांपुरते हवे असतात, अशी टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीचे नाव घेतलेले तुम्हाला चालणार नाही? तुमचं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम बेगडी आहे, हे आम्हाला माहिती आहे. शिवाजी महाराज तुम्हाला केवळ निवडणुकांपुरतेच हवे असतात. व्यंकय्या नायडू यांचा जाहीर निषेध, असे भाई जगताप यांनी ट्विट करत जाहीर निषेध केला आहे.

 

उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यानंतर उदयनराजे भोसले कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असताना सभापती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतले जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे’. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजे”, उद्धव ठाकरेंनी केली मागणी

Aprna

रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट !

News Desk

‘कोरोना’मुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राजकीय दृष्ट्या मोठे संकट ?

News Desk