नवी दिल्ली | देशातल्या व्यापारी संघटनांनी उद्या (२६ फेब्रुवारी) देशव्यापी बंद पुकारला आहे. या संपाला वाहतूक संघटना, छोटे दुकानदार आदींनी आधीच पाठिंबा दर्शवल्यामुळे उद्या दिवसभर बाजार व्यवहार ठप्प राहण्याची चिन्हं आहेत. वस्तू आणि सेवा कराच्या म्हणजे GSTच्या रचनेत फेरबदल करण्याच्या मागणीला जोर येण्यासाठी हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ही व्यापाऱ्यांची संघटना. वस्तू आणि सेवा कराच्या तरतुदींचीमध्ये फेरबदल करण्याच्या मागणीला लावून धरत या संघटनेनं २६ फेब्रुवारीला भारत बंदचंआवाहन केलं आहे.
यादिवशी देशभरातील सर्व व्यावसायिक बाजार बंद राहतील.CAIT चा दावा आहे, की यादिवशी ८ कोटीहून अधिक व्यापारी संपावर असतील. कॅटच्या नेतृत्वात येत्या २६ फेब्रुवारीला GST मधील कथित निरर्थक आणि अतार्किक तरतुदींना परत घेण्यासह अमेझॉन या इ-कॉमर्स कंपनीवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे.देशाच्या दळणवळण क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशननं आधीच कॅटच्या या व्यापारी बंदला समर्थन दिलं आहे.
सोबतच यादिवशी दिवसभर चक्का जाम करण्याचीही घोषणा या संघटनेनं केली आहे. याशिवाय मोठ्या संख्येनं अनेक राष्ट्रीय व्यापारी संघटनाही या व्यापारी बंदच्या समर्थनात समोर आल्या आहेत.यात विशेषकरून ऑल इंडिया एफएमजीसी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ ऍल्युमिनियम युटेन्सिल्स मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन, नॉर्थ इंडिया स्पायसेस ट्रेडर्स असोसिएशन, ओळ इंडिया कम्प्युटर डीलर्स असोसिएशन, ओळ इंडिया कॉस्मॅटिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन इत्यादी संघटना आहेत.