HW News Marathi
Covid-19

भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ची आता महाराष्ट्रात होणार निर्मिती ! 

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थिती आढावा बैठक घेतली. यावेळी आज (१४ मे) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राज्यातील कोरोनास्थिती, लसीकरण कार्यक्रम, म्युकरमायकोसीस, कोरोनाची तिसरी लाट आणि या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका या सर्व आरोग्यविषयक स्थितीवर भाष्य केले आहे. या सगळ्या आव्हानांसाठी राज्य सरकारने कशा पद्धतीने तयारी केली आहे, याबाबत अजित पवार यांनी माध्यमांना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत राज्य सरकार नियोजन करत आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, यावेळी आरोग्य सुविधा आणि औषधांचा कोणत्याही पद्धतीचा तुटवडा भासणार नाही याच दृष्टीने राज्य सरकार उपाययोजना करत आहे. ऑक्सिजन उपलब्धतेबाबत बोलायचे झाले तर सद्यस्थिती राज्यात 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत असून यापुढे राज्य सरकारचे 3000 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्धतेचे लक्ष्य आहे.
  • राज्याला लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्तास थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४५ वरील वयोगटातील ज्या लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे अशांना दुसरा डोस देण्याचे प्राधान्य सध्या राज्य सरकारपुढे आहे.
  • भारत बायोटेककडून पुणे जिल्ह्यात 28 एकर जमिनीची मागणी करण्यात आली असून ती तातडीने देण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. भारत बायोटेकचे लस उत्पादन सुरू होण्यासाठी अद्याप 3 महिने लागेल मात्र, आवश्यक त्या सर्व गोष्टी त्यांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे.
  • राज्य सरकार म्युकोरमायकोसीसवरील औषधांचा काळा बाजार होऊ नये याची खबरदारी घेणार आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात औषध उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसीसचे उपचार मोफत होणार आहेत. तज्ज्ञांच्या मते म्युकरमायकोसीस हा संसर्गजन्य रोग नाही.
  • रुग्णालयातील किमान 10 बेड्स लहान मुलांसाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता ८९.५३% वर  

News Desk

कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करा -अजित पवार

News Desk

एकीकडे ५ राज्यांचा निवडणुकीचा निकाल लागला अन् दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले

News Desk