HW News Marathi
Covid-19

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड

मुंबई | राज्यातील चर्चेचा विषय ठरलेली आणि अत्यंत चुरशीची झालेली गोकुळ दूधसंघाची निवडणूक सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या गटाने एकहाती जिंकली आणि सत्तांतर घडविले. या विजयानंतर आता गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी अनुभवी संचालक अशी ओळख असलेल्या विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विश्वास पाटील यांनी नुकतीच म्हणजे या गोकुळच्या निवडणुकीपूर्वीच महाडिक गटातून पाटील गटात प्रवेश केला होता.

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी खरंतर अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यात चुरस होती. दरम्यान, महाडिक गटाची ३ दशकांची सत्ता उलथवून टाकत गोकुळमध्ये जे सत्तांतर यंदा पाटील गटाने घडवून आले आहे त्या सत्तांतरात विश्वास पाटील यांचा मोठा हात असल्याचे म्हटले जाते. याचबाबत अध्यक्षपदी निवड करून विश्वास पाटील यांना बक्षीस दिल्याचे सांगितले जात आहे. गोकुळ शिरगाव एमआयडी कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील यांच्या निवडीवर शिक्कमोर्तब झाले.

गोकूळचा हा विजय जिल्ह्यातल्या सर्वसामान्य दूध उत्पादकांचा !

गोकुळ दुधसंघाच्या निवडणुकीचा निकाल हा सतेज पाटील यांनी हा विजय खेचून आणला होता. गेल्या कित्येक वर्षांपासून गोकुळ दुधसंघावर महाडिक गटाची सत्ता होती. मात्र, आता सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी ही सत्ता मिळवली. या दोन्ही नेत्यांनी खरंतर गोकुळला मल्टिस्टेट होऊ न देण्याचा निर्धारच केला होता. गोकुळमध्ये परिवर्तन होणार याची जोरदार चर्चा राज्यभर रंगली होती. अखेर सतेज पाटील गटाला ते साध्य झाले. दरम्यान, या मोठ्या यशानंतर आता सतेज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “गोकूळचा हा विजय जिल्ह्यातल्या सर्वसामान्य दूध उत्पादकांचा आहे”, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

महाडिक गटाची ३० वर्षांची निर्विवाद सत्ता पाटील -मुश्रीफ गटाने मोडून काढली !

सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने महाडिक गटाच्या राजर्षी शाहू आघाडीवर १७-४ असा विजय मिळवला आहे. महाडिक गटाची ३० वर्षांची निर्विवाद सत्ता पाटील -मुश्रीफ गटाने मोडून काढली आहे. या निवडणुकीत दोन्ही गटांकडुन २१-२१ उमेदवार रिंगणात होते तर ३ अपक्ष उमेदवारांनीही अर्ज भरला होता. गोकुळचा संचालक होणं याला कोल्हापूरात आगळावेगळा सन्मान आहे. यंदाच्या गोकुळ निवडणुकीत दिग्गज नेत्यांचे वारसदारसुद्धा उभे होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी ३ हजार कोटींची गरज – अदर पूनावाला

News Desk

राज्यात आज १४ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

नव्या वर्षाचं नागरिकांना गिफ्ट,  WHOकडून  फायझरच्या लसीला मान्यता

News Desk