HW News Marathi
महाराष्ट्र

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई | भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने उद्या (७ फेब्रुवारी ) राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज (६ फेब्रुवारी) भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून उद्या राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्यूमोनिया झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपाचर सुरू होते. लता मंगेशकर यांचे आज (६ फेब्रुवारी) सकाळी ८.१२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. लतादीदींवर आज सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी पार्कात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले असून ते शिवाजी पार्कच्या दिशने रवाना झाले आहे.

तादीदींचा शेवटाचा प्रवास हा त्यांचे निवसस्थान प्रभुकुंज येथून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. महालक्ष्मी कॅडबरी जंक्शन– हाजी अली जंक्शन–हाजी अली– वरळी सी फेस रोड– वरळी अॅट्रिया मॉल, वरळी नाका– पोद्दार हॉस्पिटल–दूरदर्शन सिग्नल–वरळीकर चौक– सिद्धिविनायक मंदिर– इंदू मिल–चैत्यभूमी सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क मैदान) दाखल होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CETचं वेळापत्रक जाहीर ; वाचा सविस्तर वेळापत्रक

swarit

‘मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही’, संजय राऊतांची संतप्त टीका

News Desk

ग्रामपंचायतीत सासू – सूनेत चुरशीची लढत! 

News Desk