HW News Marathi
महाराष्ट्र

ग्रामपंचायतीत सासू – सूनेत चुरशीची लढत! 

धुळे | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुक झालीत असुन आज त्यांचे निकाल हाती येत आहेत. मागील काही दिवसात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये एकाच घरातील दोन व्यक्तीही निवडणुकीच्या मैदानात एकमेकांसमोर उभे राहिल्याचं पाहायला मिळालं. यात प्रचारादरम्यान अगदी नात्यांचीच लढाई सुरु होती. मात्र, आजच्या निकालाने कोण कुणावर भारी पडलंय हे दाखवून दिलं.

ग्रामपंचायतमधील नात्यांच्या लढाईतील सर्वात चुरशीची लढत म्हणजे सासू सुनाची लढत. या निकालात राज्यात अनेक ठिकाणी सासू सुनेवर भारी पडल्याचं दिसतंय. सासांनी सुनांना निवडणुकीच्या रिंगणात चितपट केलंय. धुळ्यातही हेच चित्र पाहायला मिळालं आहे.सासू स्मिता चव्हाण यांना दहिवद ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 286 मतं मिळाली. दुसरीकडे त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या त्यांच्या सूनबाई सुनंदा चव्हाण यांना 285 मतं मिळाली. यात अवघ्या एका मताने पराभव पत्करावा लागला.

नांदेडमध्ये देखील सासू-सुनेची फाईट पाहायला मिळाली. या ग्रामपंचायत निवडणुकीत सासूबाईंनी सूनबाईंना पराभवाची धूळ चारली. सासू-सुनेच्या लढाईत सासूबाई रेखा दादजवार यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे सासूबाई अवघ्या चार मतांनी वरचढ ठरल्या होत्या. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सासू-सून एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अनिल बोंडें याचं मानसिक संतुलन बिघडले आहे” -अशोक चव्हाण

News Desk

…तर राजू शेट्टींनी भर चौकात विष्ठा खाण्याची तयारी ठेवावी !

News Desk

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

News Desk